Homeताज्या बातम्यासंपादकीय

मानवाच्या हातासमोर तंत्रज्ञान फिके

पुरातन काळापासून एक म्हण आहे. खोदा पहाड निकला चूहा. याचाच एक प्रत्यय आज उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बां

रुपयाची अस्थिरता…
दहशतवादाच्या घटना चिंताजनक
आश्‍वासनांची खैरात

पुरातन काळापासून एक म्हण आहे. खोदा पहाड निकला चूहा. याचाच एक प्रत्यय आज उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम सुरु असलेल्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचाव करताना जगभरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाला निसर्गासमोर हात टेकवावे लागले. उत्तरकाशीला देवभूमि म्हणून ओळखले जाते. देवभूमित जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी सिल्क्यारा बोगदा बनवण्यात येत होता. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाची नशा असलेले लोक देवभूमिवर आक्रमण करत असल्याचे वाटल्यानेच जणूकाही एक झटका दिल्याची चर्चा होवू लागली आहे. बोगदा सुरु करण्यात आल्याच्या ठिकाणी बौख नाग देवतेचे देवतेची प्रतिमा होती. काम सुरू करताना संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने बोगद्याजवळ बौख नाग देवतेचे देवतेचे मंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतू सन 2019 पासून अद्याप मंदिर बांधले नाही. याबाबत स्थानिकांनी कंपनीच्या अधिकार्‍यांना आठवण करूनही अधिकार्‍यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे हा दैवी कोप असल्याचे काही गावकर्‍यांचे म्हणणे आहे. मानवाने निसर्गावर मात करण्याच्या प्रयत्नांचा अखेर कोठेतरी शेवट असतो, असे म्हटले जाते. त्याच प्रमाणे गेल्या दोन दिवसापासून बोगद्याच्या शेजारी छोटेखानी मंदिर बनवण्यात आले. त्यासाठी पुजारीही बोलवून पूजा-अर्चा करण्यास सुरुवात होताच बोगद्याच्या शेजारी भोलेनाथांच्या प्रतिकृतीसारखीच प्रतिमा निसर्गानेच बनवली. तर रॅट मायनिंग या पध्दतीला जगभरात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, येथे आधुनिक यंत्रणांनी हात टेकल्यानंतर रॅट मायनर्संनी हाताचा चमत्कार दाखवत उर्वरित खोदकाम करून कामगारांचे जीव वाचवण्यास मदत केली. आध्यत्मामध्ये असलेली ताकद व अविष्काराची प्रचिती घटलेली पहायला मिळाली.  

बोगद्यात 41 कामगार अडकल्याच्या घटनेनंतर देशभरातील सर्व यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती. यामध्ये विविध प्रकल्पांची यंत्रणा, संरक्षण विभागाची यंत्रणा, एनडीआरएफची टिम, आरोग्य विभागाची यंत्रणा, केंद्र सरकारच्या बचाव कार्यात कार्यरत असलेली संरक्षण दलाची हेलीकॉप्टर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर बोगद्याचे काम करणारे तज्ञ एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झाले होते. पहिले 17 दिवस विविध पर्याय वापरून कामगारांना अन्न, पाणी, ऑक्सिजन यासह बोगद्यात अडकलेल्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचा कुटुंबाशी संवाद साधून देण्यात आला. हे करत असताना बचावाचे प्रयत्नही तितक्याच जोमाने सुरु ठेवण्यात आले. अमेरिकेचे अत्याधुनिक ओगर मशिन अडकून नादुरुस्त झाल्याचे घटनेने देशभरातील लोकांच्या हृदयाचा ठोका वाढला होता. अखेर 18 व्या दिवशी रॅट मायनिंगच्या टिमने बचाव कार्यास पुर्णविराम देत 41 जणांची सुटका करून माणसाने माणसाशी माणसासम वागणे हीच आमची प्रार्थना, असाचा चमत्कार पहायला मिळाला. त्यामुळे मानवाने मानवाच्या उन्नतीसाठी निसर्गावर केलेले हल्ले निसर्ग परतवून लावतो. मात्र, यामध्ये मानवाने विनाकारण कोणते कृत्य केले नसल्याचे निसर्गाच्याही ध्यानात आल्यानंतर आलेल्या रॅट मायनिंगच्या 12 जणांच्या टिमला कोणताही धोका न होता बचाव कार्य यशस्वी झाले.  

COMMENTS