Homeताज्या बातम्या

माहूरच्या महासती अनुसया माता मंदिरात अधिकमासानिमित्त धोंडे जेवण महाप्रसाद उत्साहात संपन्न; हजारो भाविकांची उपस्थिती

माहूर : पवित्र अधिकमासानिमित्त माहूर येथील महासती अनुसया माता मंदिर येथे दशनाम गोसावी संत मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला धोंडे जेवण महाप्रस

संत ईश्वर भारती महाराज समाधी सेवा हीच देवप्राप्तीचा मार्ग; बेलेश्वर संस्थान येथील हरिनाम सप्ताहात सुरेश महाराज जाधव यांचे निरूपण
उत्तर प्रदेशात शताब्दी एक्सप्रेसवर दगडफेक; सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या डब्याची काच फुटली
राहुरी विटंबना प्रकरण: आरोपीचा सुगावा देणाऱ्यास पोलिसांकडून ११ हजारांचे बक्षीस; शिवप्रेमींकडून मात्र सवाल

माहूर : पवित्र अधिकमासानिमित्त माहूर येथील महासती अनुसया माता मंदिर येथे दशनाम गोसावी संत मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला धोंडे जेवण महाप्रसाद कार्यक्रम शुक्रवारी (दि. १२ जून २०२६) मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत धार्मिक पुण्य प्राप्त केले.

हा धार्मिक सोहळा दत्तशिखर संस्थानचे महंत प.पू. श्री. १००८ धनेश्वर भारती गुरु मधुसूदन भारती महाराज (मालक) यांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आला होता. हिंदू धर्मात दर तीन वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम अधिकमासाला विशेष महत्त्व असून या महिन्यात दानधर्म व अन्नदान केल्यास विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. याच पार्श्वभूमीवर माहूरच्या पवित्र देवभूमीत असलेल्या अनुसया माता मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडले. दशनाम गोसावी संत मंडळाच्या वतीने प.पू. धनराज भारती महाराज यांच्या हस्ते अनुसया मातेला विधिवत अभिषेक, महापूजा, साडी-ओटी अर्पण, धोंड्याचा महानैवेद्य आणि महाआरती करण्यात आली.

त्यानंतर धोंडे जेवण महाप्रसाद कार्यक्रमास प्रारंभ झाला. या महाप्रसादासाठी नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावाने फुलून गेला होता. कार्यक्रमाला शेकडो साधुसंत, महंत व भक्तगण उपस्थित होते. हा सोहळा शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याची माहिती प.पू. चिंतामण भारती गुरु धनेश्वर भारती महाराज यांनी दिली.

COMMENTS