Homeताज्या बातम्या

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदेचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा-बी. एस. सरोदे

भोकर: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त भगवान श्रीकृष्ण वाचनालयात ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्

आषाढी एकादशीनिमित्त भगवानगडावर पाच लाख भाविकांची उपस्थिती; विजयी पांडुरंगाचे व भगवानबाबांचे घेतले दर्शन
Liquor Brands Banned: ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह ‘या’ ५ लोकप्रिय व्हिस्की-रम ब्रँड्सवर FSSAI ची मोठी कारवाई!
अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील मृत्यूंची उच्च न्यायालयाकडून दखल
Lokshahir Annabhau Sathe Death Anniversary Quotes In Marathi :लोकशाहीर  अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यतिथीनिमित्त स्टेटसला ठेवा त्यांचे क्रांतिकारक अनमोल  विचार

भोकर: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त भगवान श्रीकृष्ण वाचनालयात ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शनिवार (दि. 1 ऑगस्ट) रोजी दुपारी आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, वाचक आणि साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दिलीप सोनवाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका प्रतिनिधी दिनेश लक्षटवार, सानेगुरुजी वाचनालयाचे ग्रंथपाल शिवाजी सूर्यवंशी, तसेच प्रमुख व्याख्याते व नागसेन वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष बी. एस. सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख व्याख्याते बी. एस. सरोदे यांनी लेखन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद करताना अण्णाभाऊ साठे यांच्या समृद्ध साहित्यसंपदेची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासून सातत्याने लेखनाचा सराव करावा, कारण लेखनातूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास घडतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाला अरुणाताई कपाटे, नंदाबाई चिल्लेवार, अल्काताई महानुभाव, दीपकराज कपाटे आणि अमरसिंग राठोड यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महंत प्रभाकर कपाटे बाबा यांनी केले.

COMMENTS