Homeताज्या बातम्यादेश

बांदीपोरामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

बांदीपोरा ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मिरच्या खोर्‍यात दहशतवाद्यांचा धुडगूस सुरूच असून, जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सोमवारी सकाळी सु

प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांचा उपरोधिक सवाल; नगरसेवक अ‍ॅड. महेश कनकदंडे यांना नागरिकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही, नेटवर्क नाही की नेतेच नाहीत?
दिलेला शब्द पाळला! उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आदिल शाह कुटुंबाला नवीन घरपहलगाम हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना प्राणार्पण; युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने दाखवली सिंघम 3 ची झलक

बांदीपोरा ः गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मिरच्या खोर्‍यात दहशतवाद्यांचा धुडगूस सुरूच असून, जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये सोमवारी सकाळी सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. येथे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू आहे.रविवारी अरगामच्या जंगलात गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम राबवली. सोमवारी सकाळी शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह जंगलात पडला आहे. तो ड्रोनमधून दिसत होता. त्याची ओळख पटलेली नाही. 16 जून रोजीच गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठक घेतली. ज्यात त्यांनी अधिकार्‍यांना दहशतवादाचा मुकाबला करण्याचे निर्देश दिले आणि दहशतवाद्यांना मदत करणार्‍यांवर कठोर कारवाई करा. या बैठकीत जम्मू-काश्मीरचे गृह सचिव मनोज सिन्हा, एनएसए अजित डोवाल, सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल, रॉ, आयबी, लष्कर आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जम्मू-काश्मीरचे गृह सचिव मनोज सिन्हा, एनएसए अजित डोवाल, सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल, रॉ, आयबी, लष्कर आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते. 9 जूननंतर चार दहशतवादी हल्ले झाले आहेत जम्मू आणि काश्मीर मध्ये 9 जूनपासून रियासी, कठुआ आणि डोडा येथे चार ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये नऊ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला. दरम्यान, एक नागरिक आणि सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

COMMENTS