Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावध राहा! जंगलांनंतर आता तस्करांचा मोर्चा ’मालकी’ सागवानाकडे; किनवट पोलिसांची मोठी कारवाई

किनवट : जंगलातील वनसंपदेची लूट केल्यानंतर आता लाकूड तस्करांनी आपला मोर्चा खासगी मालकी पट्ट्यातील सागवान लाकडाकडे वळवला आहे. शनिवारपेठ येथील मालकी

किनवटमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी;पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन
किनवट न्यायालयात 9 मे रोजी ’लोकअदालत’; पूर्वतयारीसाठी आढावा बैठक
तहसील कार्यालयातील जप्त वाळूसह ऑटो चोरणारा अटकेत; किनवट पोलिसांची धडक कारवाई

किनवट : जंगलातील वनसंपदेची लूट केल्यानंतर आता लाकूड तस्करांनी आपला मोर्चा खासगी मालकी पट्ट्यातील सागवान लाकडाकडे वळवला आहे. शनिवारपेठ येथील मालकी पट्ट्यात साठवून ठेवलेले सागवान लाकूड लंपास करणार्‍या टोळीचा प्रयत्न किनवट पोलिसांनी हाणून पाडला. कोठारी वन तपासणी नाक्याजवळ पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत लाकडासह ऑटोरिक्षा जप्त केला असून, ही कारवाई तस्करांचे धाबे दणाणणारी ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिलच्या रात्री किनवट पोलीस पथक गस्तीवर होते. याच दरम्यान शनिवारपेठ येथून चोरलेले सागवान लाकूड एका ऑटोरिक्षातून (क्र. नमूद नाही) कोठारी मार्गे नेले जात होते. कोठारी येथील वनविभागाच्या तपासणी नाक्यावर पोलिसांची चाहूल लागताच, कारवाईच्या भीतीने तस्करांनी चालता रिक्षा सोडून अंधाराचा फायदा घेत जंगलात पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून लाकडाने भरलेला ऑटोरिक्षा ताब्यात घेऊन तो पुढील कारवाईसाठी किनवट वनविभागाच्या स्वाधीन केला आहे. याप्रकरणी वनविभागाने वनगुन्ह्याची नोंद केली आहे. जप्त करण्यात आलेले लाकूड हे खासगी मालकीच्या पट्ट्यातील साठवणूक केलेले होते, ही बाब तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे आता मालकी पट्ट्यातील लाकूड व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, तस्करांचे हात थेट घरापर्यंत पोहोचत असल्याने मोठी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासातून आंतरराज्यीय लाकूड तस्करांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी जप्त केलेला रिक्षा आणि लाकूड आमच्या स्वाधीन केले असून, आम्ही वनगुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना जेरबंद करू.,संजय कोम्पलवार, वनपाल किनवट बीट,फिरते पथक जंगलातील झाडे संपवत आल्यानंतर आता तस्करांनी आपली नजर लोकांच्या खासगी साठवणुकीवर वळवली आहे. त्यामुळे ज्यांनी मालकी पट्ट्यातील सागवान साठवले आहे, त्यांनी स्वतःच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी अधिक दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS