Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा कारागृह बीड येथे कैद्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पडेस्कची स्थापना

बीड : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा कारागृह बीड येथ

राष्ट्रीय महामार्गांवरील भेगांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले; प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह – डॉ. गणेश ढवळे यांची टीका
वंजारवाडीत मनरेगा कामात भ्रष्टाचाराचा आरोप; चौकशी करण्याची बदामराव पंडितांची मागणी
नाळवंडी मंडळातील समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादनागरिकांना गावातच विविध सेवांचा लाभ देण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्धारअनेक विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध; लाभ घ्यावा-तहसीलदार शेळके

बीड : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा कारागृह बीड येथे कैद्यांच्या नातेवाईकांसाठी विधी सेवा व सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी हेल्पडेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड व जिल्हा कारागृह प्रशासन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. दिनांक 6 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडचे अध्यक्ष मा. आनंद एल. यावलकर यांच्या हस्ते या हेल्पडेस्कचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. वहाब ए. सय्यद, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक श्री. चांदणे, लोकअभिरक्षक कार्यालयाचे मुख्य विधी सहाय्य संरक्षक अ‍ॅड. पी. व्ही. दगडखैर तसेच सहायक विधी सहाय्य संरक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. या हेल्पडेस्कचा मुख्य उद्देश म्हणजे कैद्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या प्रकरणांबाबत आवश्यक विधी माहिती, मार्गदर्शन व मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. दररोज सकाळी 10 ते 10.45 या वेळेत लोकअभिरक्षक कार्यालयातील विधिज्ञ मुलाखत कक्षात उपस्थित राहून नातेवाईकांना कोर्टातील प्रकरणांची सद्यस्थिती, आवश्यक कागदपत्रे व पुढील प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. या उपक्रमामुळे कैद्यांच्या नातेवाईकांना न्यायालयीन प्रक्रियेची योग्य माहिती मिळून त्यांना कायदेशीर मदत सुलभपणे मिळणार असल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

COMMENTS