पुणे : ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याच्या वादावर अखेर पार्थ पवार यांनी मौन सोडले असून, हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक असल्याचे त्यांन

पुणे : ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याच्या वादावर अखेर पार्थ पवार यांनी मौन सोडले असून, हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित एजंटवर कारवाई करत करार रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
तीन महिन्यांपूर्वी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले होते. या दुर्घटनेनंतर संबंधित कंपनीच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित झाले होते. विशेषतः रोहित पवार यांनी विमान देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेवर टीका करत संबंधितांना जबाबदार धरण्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर, त्याच कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी प्रवास केल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. या वादावर स्पष्टीकरण देताना पार्थ पवार यांनी सांगितले की, तातडीच्या कामासाठी पुण्यातील मोदी बाग येथे पोहोचणे आवश्यक होते. त्यामुळे कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांनी पुढे म्हटले की, शेवटच्या क्षणी करण्यात आलेल्या बुकिंगमुळे नकळतपणे ‘व्हीएसआर एव्हिएशन’चे विमान आरक्षित करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत हे विमान कोणत्या कंपनीचे आहे, याची मला कल्पना नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS