Homeताज्या बातम्याअहमदनगर

पीएसआय परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार    

 कोपरगाव : स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाचे माजी विद्यार्थी साईनाथ वर्पे व  अनिल गांगवे यांनी नुकतीच पोलीस खाते अंतर्गत पीएसआय परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त संदीपराव रोहमारे, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके, डॉ. रविंद्र जाधव यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. सत्काराप्रसंगी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संयम, परिश्रम व अभ्यासातील सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर आपण कोणतेही यश सहज मिळवू  शकतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संयम सर्वात महत्वाचा गुण आहे. अपयश जरी आले तरी ते अत्यंत परिपक्वपणे स्वीकारावे व आत्मपरीक्षण करून आपल्या चुका  टाळाव्या, हेच यशाचे खरे गमक असल्याचे म्हटले.

श्री गुरुदत्त इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा 100 टक्के निकाल
शेतकरी हितासाठी विधान परिषदेत आवाज बुलंद करणार : आमदार विवेक कोल्हे ; शेतमालाच्या योग्य बाजारभावासाठी लढणार
ट्रकमधून पडून ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू

COMMENTS