Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजभवनाच्या नावाने बँकेत खाते नसल्याने पैसे पक्षाला दिल्याचा न्यायालयात युक्तीवाद

मुंबई / प्रतिनिधी : किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान, ग

किल्ले प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे अनावरण
मंगळवारी ना. शंभूराज देसाई यांचा जनता दरबार
जुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर; ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम

मुंबई / प्रतिनिधी : किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटक पूर्व जामीन अर्जावर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान, गोळा केलेला निधी आम्ही पैसे राजभवनाच्या खात्यात जमा करण्यास गेलो होतो. मात्र, बँकेमध्ये राजभवनाच्या नावाने कोणतेही खाते नसल्यान हे पैसे पक्षाला देण्यात आल्याचा युक्तीवाद किरीट सोमय्या यांच्या वकीलांनी न्यायालयात केला आहे. दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध केला आहे.
संबधित घटना सन 2013 मधील असून, ज्यावेळी विक्रांत युध्दनौका वाचवण्याची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सहभागी असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले. तसेच तक्रारदारांनी दिलेली तक्रार ही प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीवर आधारित असून, आर्थिक गुन्हे शाखेने या अटकपूर्व जामीनाला विरोध केला आहे.
सन 2013 च्या घटनेची आताच का दखल घेतली जात असे सांगत, विक्रांतसाठी शिवसेनेनेही पैसे जमा केल्याचे सोमय्यांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे या प्रकरणात शिवसेनेलाही आरोपी करण्याचा युक्तीवाद करण्यात आला आहे. तक्रारीत किरीट सोमय्या यांनी विश्‍वास संपादन करून हे पैसे गोळा करून फसवणूक केल्याचा उल्लेख करण्यात आला. तसेच ही रक्कम राज्यपालांकडे जमा न करता स्वत:चा फायदा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पैशांचा वापर केला कुठे ?
सोमय्या हे एका राजकीय पार्टीचे नेते आहेत. त्यांनी त्या पैशांचा वापर मग केला कुठे? ही रक्कम आयएनएस विक्रांतसाठी वापरण्यात येईल या अनुषंगाने जमा केली होती. पण ही रक्कम इतर कामासाठी वापरली गेली असेल तर हा कायदेशीर गुन्हा होतो, असा युक्तीवाद न्यायालयात सरकारी वकीलांकडून करण्यात आला. विक्रांतला वाचवण्यासाठी कुठुनही पैसे आले असते पण महापालिका आणि इतर माध्यमांनीही युध्द नौका वाचवण्यासाठी मदत करायची घोषणा केली होती. मात्र, पैसेच आले नाहीत.
पण सोमय्या हे विक्रांतसाठी जमा केलेले पैसे राजभवन येथे देणार होते. तशा बातम्याही छापून आल्या होत्या. पण विक्रांत वाचवण्यासाठी राजभवनात कुठलेही खाते नसल्याचे सोमय्या यांच्या वकिलांनी न्यायालयात सागितले. तसेच भूक लागलेल्या माणसाने चोरी करावी. मात्र, परिस्थितीचा फायदा घेऊन लोकांचा विश्‍वास घात करू नये. विक्रांतसाठी जमा केलेले पैसे गेले कुठे? याचा शोध लागणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी करत सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनाला जोरदार विरोध केला. तसेच याला प्रत्युत्तर देताना, आम्ही पैसे द्यायला गेलो होतो. मात्र, खातं नसल्यामुळे आम्ही ते पैसे पार्टीला दिले, असे सोमय्या यांच्या वकिलांनी सांगितले.

COMMENTS