Homeताज्या बातम्या

तामसा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध देशी दारूसह दोन जेरबंद, ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

तामसा: तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन जणांना त

गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे ५ जणांचा मृत्यू; आसाममध्ये पुराचा हाहाकार, बळींचा आकडा ६१ वर
मिनी बस दरीत कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू; राजगड परिसरातील पाबे घाटातील भीषण अपघात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६: पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध होणार! आधार प्रमाणीकरणाचे आवाहन
दिघीत १६ हजारांच्या विदेशी दारूसाठ्यावर पोलिसांची कारवाई; एकावर गुन्हा |  शबनम न्युज

तामसा: तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक व विक्रीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत अवैध देशी दारूचे सहा सिलबंद बॉक्स आणि एक मोटारसायकल असा एकूण ९३ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ जुलै रोजी सकाळी सुमारे ७.२० वाजता तामसा-अर्धापूर मार्गावरील जिनिंगजवळ गस्तीदरम्यान दोन संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून देशी दारूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचून अतुल देवराव हटकर व शेख सलीम हाजी (दोघेही रा. तामसा) यांना ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून ‘भिंगरी संत्रा’ देशी दारूचे ६ सिलबंद बॉक्स (किंमत २३ हजार २०० रुपये) आणि अंदाजे ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ९३ हजार २०० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १२९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार चक्रधर शिवाजीराव पवार (बकल क्रमांक ६११) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास तामसा पोलीस करीत आहेत.

अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात तामसा पोलिसांनी केलेल्या या तातडीच्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे. अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाईची मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS