Homeताज्या बातम्या

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे गेवराईत जल्लोषात स्वागत; बाजीराव चव्हाण यांच्या वतीने भव्य सोहळा

बीड: महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. श्री. संजय राठोड यांचे गेवराई येथे आगमन होताच शिवसेना व युवासेनेच्या वतीने भव्य व उत्स्फूर

राजीनामा झाला; आता पुढे काय ?
महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
विजेचा शॉक लागून १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; राहुरी तालुक्यातील सडे येथील हृदयद्रावक घटना

बीड: महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा. ना. श्री. संजय राठोड यांचे गेवराई येथे आगमन होताच शिवसेना व युवासेनेच्या वतीने भव्य व उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवासेना कार्याध्यक्ष मा. श्री. पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

युवासेना मराठवाडा निरीक्षक तथा लोकसभा संपर्कप्रमुख आरोग्यसेवक बाजीराव दादा चव्हाण यांच्या वतीने मंत्री संजय राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला शिवसेना व युवासेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती.

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, युवासेना मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, नगरसेवक तथा युवासेना विधानसभा अध्यक्ष सुरज चुंगडे, युवासेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश पवार, शिवसेना गेवराई तालुकाप्रमुख उद्धव मडके, युवासेना तालुकाप्रमुख बिभीषण मोघे, युवासेना उपाध्यक्ष काशिनाथ जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष महादेव मातकर, विधानसभा संपर्कप्रमुख शिवराज उगले, युवासेना उपाध्यक्ष गणेश मकाळ, धर्मवीर प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक लिंबाजी जाधव, युवाउद्योजक डॉ. ज्ञानेश्वर जाधव, विलास मस्के यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक, धर्मवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मंत्री संजय राठोड यांचे स्वागत करत मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यातील तसेच बीड जिल्ह्यातील जलसंधारण, सिंचन व ग्रामीण विकासाच्या कामांना अधिक गती मिळावी, अशा शुभेच्छा दिल्या. मंत्री संजय राठोड यांनीदेखील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्वीकार केला.

COMMENTS