Homeताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू; राहुरी तालुक्यातील सडे येथील हृदयद्रावक घटना

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील सडे येथे विजेचा जोरदार धक्का लागून १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २८) सका

बीडमध्ये आरक्षण वर्गीकरणावर परिसंवादाचे आयोजन; ५ जुलै रोजी सामाजिक न्याय भवनात होणार चर्चा
कंत्राटी शिक्षक भरतीत ट्रेनी शिक्षकांना सामावून घ्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
अ‍ॅड. साळुंके यांनी वकिलीला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवोद्गार,
विजेचा झटका लागला अन् तो जागीच मरण पावला, परिसरात उडाली खळबळ | Navarashtra

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील सडे येथे विजेचा जोरदार धक्का लागून १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २८) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सडे गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून झडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सडे येथील यशदीप कृष्णा झडे (वय १४) हा आपल्या राहत्या घरी खेळत असताना काही कारणास्तव घराच्या पत्र्यावर चढला होता. घराच्या वरच्या बाजूने महावितरणची मुख्य वीजवाहिनी गेली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या वीजवाहिनीतून करंट उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान खेळत असताना यशदीपचा चुकून त्या विद्युत तारेला स्पर्श झाला आणि त्याला जबर विजेचा धक्का बसला.

विजेचा धक्का बसताच यशदीप घराच्या पत्र्यावरून खाली कोसळला. हा अत्यंत गंभीर प्रकार पाहताच कुटुंबीय व शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्याला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

मयत यशदीप हा सडे येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने तो घराजवळ खेळत असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. अभ्यासू व मनमिळावू स्वभावाच्या यशदीपच्या अकाली निधनामुळे शाळा परिसरात आणि सडे गावात मोठी शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर निवासी भागातील घरांच्या अगदी जवळून किंवा वरून जाणाऱ्या वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात अशा धोकादायक वीजवाहिन्यांची महावितरणने तातडीने तपासणी करावी, तसेच आवश्यक दुरुस्ती व सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS