राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सत्ताऱ्यांकडे बहुमताचा अभाव !

Homeताज्या बातम्यादखल

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सत्ताऱ्यांकडे बहुमताचा अभाव !

राष्ट्रपती पदासाठी येत्या जुलै मध्ये निवडणूक होणार असल्याने त्यादिशेने सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकारण आता वळण घेऊ लागले आहे. सध्याची स्थिती पाहता र

संघर्षातुन माझ्या राजकीय जीवनाची सुरु
प्रवीण दरेकरांवरील कारवाईला वेग
वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती आता मिळणार ऑनलाईन : ॲड. अनिल परब

राष्ट्रपती पदासाठी येत्या जुलै मध्ये निवडणूक होणार असल्याने त्यादिशेने सत्ताधारी आणि विरोधकांचे राजकारण आता वळण घेऊ लागले आहे. सध्याची स्थिती पाहता राष्ट्रपती निवडणूकीसाठी ज्यांना मतदानाचा अधिकार असतो त्या लोकसभा आणि राज्यसभा खासदार तसेच प्रत्येक राज्यातील विधानसभा आमदार यांच्या मतांचे एकूण मूल्य दहा लाख ब्यान्नव हजार सहाशे त्र्याण्णव एवढे असते. या मतांचे मूल्य पाहिले तर सत्ताधारी भाजपापेक्षा विरोधी पक्षांकडे मत मूल्यांची आघाडी जास्त आहे. सत्ताधारी भाजपकडे राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून येण्यासाठी किमान दहा हजारांपेक्षा अधिक मत मूल्य कमी आहेत. त्यामुळे, विरोधकांची एकजूट झाली तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला चकवा मिळू शकतो. परंतु, कोणताही सत्ताधारी पक्ष राष्ट्रपती पद हे आपण निवड केलेल्या उमेदवाराकडेच राखलं जावं यासाठी प्रयत्न करित असतो. त्यामुळे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीसाठी हालचाल सुरू केल्याचे जाणवते. विरोधी पक्षांना कधीही भेट न देणारे मोदी सध्या सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. अर्थात, विरोधी पक्षांचे मतमूल्य किंचितसे का असेना पण सत्ताधारी आघाडी पेक्षा ते अधिक आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे वास्तव लक्षात आल्यानेच मोदींच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. तर, दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांच्या आघाडीत देशातील अनेक पक्षांचे मिळून ही अधिकच्या मतमूल्यांचे गणित आपल्याला दिसते. परंतु, राजकारणात एक अधिक एक चार होत नसून ते पाच होतात, असे संकेत मानले जातात. त्या अर्थाने काही छोटे दल निवडणुकीत आपल्या गळाला लागावेत असा प्रयत्न होणार, यात शंका असण्याचे कारण नाही. यातील दोन पक्ष जे विरोधी पक्षाची छावणी मजबूत करतील त्यातील तामिळनाडू  आणि पंजाबचे वर्तमान सत्ताधारी पक्ष. तामिळनाडू चे राजकारण हे केंद्राकडून आपल्याला काही विशेष पदरात पाडून घेता येणार असेल तर त्यादृष्टीने या निवडणुकीत आपली भूमिका ठरवेल. बहुधा, दक्षिण भारताचे राजकारण अशा व्यावहारिक सूत्रानुसार अधिक संचलित होते. त्यामुळे तामिळनाडू बहुजन सत्ताकारणाचे केंद्र असले तरी  व्यावहारिक भूमिका सत्ताधारी कशी घेतात, यावर बरेच काही निर्भर असते. तर, दुसरा पक्ष म्हणजे आप. आम आदमी पार्टी हा वरकरणी भाजपा आणि मोदींचा स्पर्धक वाटत असला तरी ते वास्तव नाही. प्रत्यक्षात या पक्षाचा उदय हा आर‌एस‌एस च्या कुशीतून झाला असल्याचे बोलले जाते. पंजाब सारख अतिशय सुजलाम सुफलाम प्रदेशात राजकीय सत्ता जिंकणाऱ्या या पक्षाची भूमिका या निवडणूकीसाठी अजून संदीग्ध आहे. त्याचप्रमाणे देशातील अनेक छोटे पक्ष राजकीय किंमत चुकवून घेण्यासाठी भाजप आघाडीत सामील होणारच नाही, असेही ठामपणे सांगता येत नाही. विरोधी पक्षाची ताकद किंचितसी जास्त असली तरी विरोधी आघाडीतील मोठे पक्ष आणि नेते हे जोपर्यंत ठाम भूमिका घेत नाही, तोपर्यंत विरोधी गोटात आत्मविश्वास निर्माण होवू शकत नाही; हे जरी सत्य असलं तरी एकूणच विरोधकांना संघ-भाजपचा भावी काळातील धोका जाणवू लागल्याने त्यांच्या एकत्र येऊन दमदार आघाडी उघडण्याचे संकेत दिसू लागले आहेत. अर्थात, विरोधी पक्षाने राष्ट्रपती निवडणुकीत आपले प्रस्थ निर्माण केले नाही, तर, २०२४ ची लोकसभा निवडणूक ते मनाने हरलेले असतील. अर्थात, भाजप यात एक गेम खेळू शकेल; तो म्हणजे आतपर्यंत आदिवासी व्यक्ती राष्ट्रपती झाला नसल्याचे एक भावनात्मक आवाहन उभे करेल. ज्यामुळे काॅंग्रेससारख्या पक्षाचीही फरफट होईल. परंतु, भूमिका घेऊन आघाडी बरकरार ठेवण्याचा मुत्सद्दीपणा विरोधी पक्षात आला तर राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक चुरशीची होईल !

COMMENTS