Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेहकर येथील वसतिगृहात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; वसतिगृहाचे नामकरण आता ’क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींचे वसतिगृह’

बुलढाणा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलढाणा अंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह, मेहकर येथे 8 एप्रिल ते 14 एप

केज येथे महात्मा बसवेश्वर जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी
बसवेश्वर जयंतीच्या बॅनरमधून भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर ; परशुराम जयंतीकडे मात्र काही नेत्यांचा कानाडोळा ?
डॉ. आंबेडकर यांना कोपरगावात राष्ट्रवादीकडून अभिवादन
भोकर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे 'क्रांतिज्योती सावित्रीबाई  फुले वसतिगृह' असे नामकरण करण्यात आले असून, आज हा कार्यक्रम ...


बुलढाणा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बुलढाणा अंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह, मेहकर येथे 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत ’सामाजिक समता सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाचे औचित्य साधून वसतिगृहाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले असून, आता हे वसतिगृह ’क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींचे वसतिगृह, मेहकर’ या नावाने ओळखले जाणार आहे.
सप्ताहाची सुरुवात 8 एप्रिल रोजी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींसाठी विशेष भाषण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा वानखेडे (बी.फार्म) यांनी तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद गृहपाल संध्या देखणे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून सलोनी सदाशिव (बी.फार्म) यांनी संविधानावर सखोल मार्गदर्शन केले. नेहा इंगळे, संघमित्रा वानखेडे, आणि साक्षी ताजने या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून संविधानाचे महत्त्व विषद केले.
11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त 12 एप्रिल रोजी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थिनींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महापुरुषांच्या विचारांना उजाळा दिला.
14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित गीते गायली आणि आपले मनोगत व्यक्त केले. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनींसह बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप प्र. गृहपाल संध्या देखणे यांनी सर्वांचे आभार मानून केला. सामाजिक समतेचा संदेश देणार्‍या या सप्ताहामुळे वसतिगृहात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS