Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलडाण्यात माजी सैनिकांसाठी आरोग्य सेवेला नवे बळ; कमांडिंग मेजर जनरलच्या हस्ते दवाखान्याचे भूमिपूजन!

बुलडाणा : येथील गायरान, सागवान परिसरात केंद्र शासनाच्या माजी सैनिक अंशदायी स्वास्थ योजनेअंतर्गत उभारण्यात येणार्‍या दवाखान्याचे भूमिपूजन शनिवार 1

होर्मुझमधील तणावातही ‘जग विक्रम’ भारतात; कांडला बंदरात एलपीजीसह सुरक्षित दाखल
अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य
अमरावती जिल्ह्यात दोघांचा उष्माघाताने मृत्यू
ECHS facilities: Unmarried disabled sons eligible for service even after  attaining 25 years of age | India News – India TV

बुलडाणा : येथील गायरान, सागवान परिसरात केंद्र शासनाच्या माजी सैनिक अंशदायी स्वास्थ योजनेअंतर्गत उभारण्यात येणार्‍या दवाखान्याचे भूमिपूजन शनिवार 11 एप्रिल रोजी उत्साहात पार पडले. नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया चे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल नवतेज सिंह सोहल (सेना मेडल) यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संबंधित दवाखान्याच्या बांधकामासाठी जागा अधिकृतरित्या ठेकेदारांकडे सुपूर्द करण्यात आली. भविष्यात या दवाखान्याचा लाभ सुमारे 17,074 माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना होणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
कार्यक्रमास कर्नल सुहास जतकर (बुलडाणा), कर्नल राजीव कौशिक (नागपूर), लेफ्टनंट कर्नल विनीत पठाणिया, कर्नल अनुपम श्रीवास्तव (भुसावळ मिलिटरी स्टेशन), तसेच कर्नल अभय शंकर मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अधिकार्‍यांनी स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधत माजी सैनिकांना आरोग्य सेवा पुरविताना येणार्‍या अडचणींबाबत चर्चा केली. यात डॉ. दीपक लद्दड, डॉ. शोन चिंचोले, डॉ. विवेक मोरे, डॉ. काटकर, डॉ. नितेश छाजेड आणि चिखली येथील डॉ. जवंजाळ यांचा सहभाग होता. तसेच सुभेदार मेजर अशोक शेळके व माजी सैनिक स्वास्थ योजना समितीच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. यानंतर बुलडाणा येथील विद्यमान माजी सैनिक दवाखान्यात भेट देऊन सैनिक व कर्मचार्‍यांशी थेट संवाद साधत सेवा सुविधांची माहिती घेण्यात आली.

COMMENTS