Homeताज्या बातम्या

धोंडा खायला बोलावले नाही म्हणून वकील पत्नीस मारहाण; श्रीरामपूर शहर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर : माहेरी एकटीच गेली, तसेच धोंडा जेवणासाठी बोलावले नाही या कारणावरून वकील पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची धक्क

सैन्य दल व महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड झालेल्या कोपरगावच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान
तनपुरवाडी येथील नदीचे लोकवर्गणीतून खोलीकरण; सरकारी मदतीशिवाय ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम
‘एसएसजीएम’मध्ये माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहात; आमदार विवेक कोल्हे यांच्यासह मान्यवरांचे अभिनंदन
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये धर्मांधांचे  २ हिंदूंवर प्राणघातक आक्रमण ! - सनातन प्रभात

श्रीरामपूर : माहेरी एकटीच गेली, तसेच धोंडा जेवणासाठी बोलावले नाही या कारणावरून वकील पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह सासू आणि दिराविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत व्यवसायाने वकील असलेल्या कावेरी अभिजित शिंगोटे (सध्या रा. कसबापेठ, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. २५ मे रोजी दुपारी त्या श्रीरामपूर येथील वॉर्ड क्रमांक ७ मधील आपल्या माहेरी आल्या होत्या. त्यावेळी पती अभिजित शिंगोटे यांनी मोबाईलवर संपर्क साधून, “तू माहेरी एकटी का गेलीस आणि मला धोंडा खायला का बोलावले नाही?” असा जाब विचारत शिवीगाळ केली.

त्यानंतर पती अभिजित शिंगोटे, सासू मंदा शिंगोटे व दीर अतुल शिंगोटे हे त्यांच्या माहेरी आले. तिथे वाद वाढल्यानंतर अभिजित शिंगोटे यांनी लाकडी दांड्याने फिर्यादीच्या डोक्यावर आणि उजव्या पायावर मारहाण करून त्यांना जखमी केले. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादीची आई व शेजारी धावून आले असता, दीर अतुल शिंगोटे यांनी “तू पुन्हा नांदायला येऊ नको, आलीस तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

COMMENTS