Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रांजणगाव येथे श्री काळभैरवनाथ यात्रा उत्साहात छबिना, पालखी मिरवणुकीसह भव्य कुस्ती आखाडा

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील श्री काळभैरवनाथ यात्रा मंगळवारी (दि. ८) मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पडली. यात्रेनिमित्त सुपा

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिशिंगणापूरमध्ये अलोट गर्दी 
यमुना नदीत बोट उलटून दहा जणांचा मृत्यू
वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला घेऊन चालणारामाजी मंत्री थोरात ; संगमनेर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील श्री काळभैरवनाथ यात्रा मंगळवारी (दि. ८) मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पडली. यात्रेनिमित्त सुपा पंचक्रोशीतील भाविक, विशेषत: महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे रात्री आठ वाजता श्री काळभैरवनाथांची काठी, छबिना व पालखीची गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान सर्व देवतांची विधिवत पूजा करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. ही परंपरा वर्षानुवर्षे अखंडपणे सुरू असल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. रात्रीच्या वेळी मनोरंजनासाठी पारंपरिक तमाशा सादर करण्यात आला. ‘जीवंत कला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला परिसरातील सर्व समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दुसऱ्या दिवशी यात्रेची सांगता भव्य कुस्ती आखाड्याने झाली. महाराष्ट्रातील विविध भागांतून नामांकित मल्ल या आखाड्यात सहभागी झाले होते. यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आखाड्यात शंभर रुपयांपासून कुस्त्यांची सुरुवात होऊन अंतिम मानाच्या कुस्तीमध्ये राहुल पाटील शिंदे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना एक्कावन्न हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील पाहुण्यांचेही स्वागत करण्यात आले. कुस्ती आखाड्याचे नियोजन राहुल पाटील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच महेश देशमुख, प्रा. चंद्रकांत शिंदे, लक्ष्मण जवक, उपसरपंच शिवाजी शिंदे, आप्पासाहेब शिंदे पाटील, माजी सरपंच शरद सरोदे, बंटी साबळे, बाबा जवक, दत्ता लोणकर, सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल जवक, प्रकाश गाढवे, संग्राम पाटील शिंदे, काशिनाथ लोणकर, अरुण देशमुख, भिमा शिंदे, मोहन लोणकर, बापूसाहेब जवक आदींच्या सहकार्याने करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब देशमुख यांनी केले.

COMMENTS