Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारकरी संप्रदाय हा सर्व समाजाला घेऊन चालणारामाजी मंत्री थोरात ; संगमनेर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

संगमनेर : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायात सर्व समाज एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह करतात. सर्व समाजाला एकत्र आणण्याचे वैशिष्ट्य वारकरी संप्रदायाचे आहे. वारकरी संप्रदायाला मोठी संतपरंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे काव्य मानवतेच्या कल्याणासाठी असून सर्व समाजाला एकत्रित पुढे घेऊन जाणारा वारकरी संप्रदाय असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.संगमनेर खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांचे किर्तन झाले .याप्रसंगी आर. एम. कातोरे, एस पी गोडसे, गणेश शिंदे, रमेश सुपेकर, भगवान गोफणे, दीपक भोर, दत्तात्रय खुळे, तरुण वर्ग व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी थोरात म्हणाले की वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती धर्म समाजातील अनेक संतांनी समतेचा विचार दिला. हा मानवतेचा विचार आहे. त्यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी हे महाकाव्य व पसायदान हे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहे. या संत मांदियाळीत संत तुकाराम, संत चोखोबा, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत एकनाथ, संत नरहरी सोनार, असे अठरापगड समाजातील संत होऊन गेले. वारकरी संप्रदाय हा मानवतेचा धर्म सांगणारा असल्याने हा विचार आपल्याला जपायचा असून सर्वांना पुढे न्यायचा असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.तर हभप कविराज महाराज झावरे म्हणाले की वारकरी संप्रदायाचा विचार पुढे नेणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे आहेत. सर्वांना सामावून घेत त्यांनी संगमनेर तालुका हा राज्यामध्ये अव्वल बनवला आहे. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करून ईश्वराची सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.यावेळी गावकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री थोरात यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संगमनेर खुर्द मधील नागरिक, महिला, युवक यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 
इथेनॉल हे इंधनाला सर्वोत्तम पर्यायमाजी मंत्री थोरात ; थोरात कारखान्यातून दीड कोटी लिटर इथेनॉल निर्मिती
 विश्वनाथ गाढे यांचे निधन

COMMENTS