Homeताज्या बातम्या

श्री गजानन बँकेच्या पिंपळनेर शाखेत ग्राहक मेळावा संपन्न

श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड च्या पिंपळनेर शाखेच्या वतीने गुरुवार दि.6 रोजी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास बँकेचे उ

व्याज परताव्यासाठी तातडीने निधी द्या : आ. तांबे
उद्योजक राहुल भारत लोखंडे यांची आत्महत्या
महात्मा फुले नगररचनाकार आणि उद्योजकही होते “: मुख्यमंत्री फडणवीस



श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड च्या पिंपळनेर शाखेच्या वतीने गुरुवार दि.6 रोजी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव नरवडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉ.एम.एस. शेख, गंगाधर घुमरे, सतीश पाटील, डॉ.शिंदे,कल्याण खांडे, चंद्रकांत पेंढारे, लक्ष्मण नागरगोजे, अर्जुन जामकर, विक्रम नागरगोजे, कांता डोईफोडे, चंद्रकांत यादव, रामेश्वर सातपुते, राजा कुलकर्णी, गोकुळ सावंत, बिभीषण डोईफोडे, अशोक सिरसाट, देवीलाल चरखा, मिठू बिटके, उमेश आनेराव, अनिल ठाकरे, बंडू इंगोले यांच्यासह परिसरातील व्यापारी, ठेवीदार, उद्योजक, हॉटेल व्यवसायिक, ज्येष्ठ नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना अरुण बोंगाणे यांनी केली. यावेळी सरव्यवस्थापक डॉ.शेख एम.एस. यांनी बँकेची आर्थिक स्थिती व पिंपळनेर शाखेच्या प्रगतीची माहिती दिली. ग्राहक मेळाव्यात बँकेच्या विविध योजना, उइड, -ढच, फोन पे, मोबाईल बँकिंग व शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

COMMENTS