Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा फुले नगररचनाकार आणि उद्योजकही होते “: मुख्यमंत्री फडणवीस

पुणे : महात्मा जोतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले शेतकरी, कुशल नगररचनाकार आणि यशस्वी उद्योजकही होते. सर्वसामान्य माणस

मिसिंग लिंकचे शिल्पकार डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
जागतिकीकरणाच्या मूर्त स्वरूपाच्या शिल्पकाराची देशाने दखल घ्यावी !
‘मिसिंग लिंक’ 1 मेपासून होणार सुरू
Fadnavis on Women Reservation | महिला आरक्षणावर फक्त महिलांनीच टाळ्या का  वाजवल्या? फडणवीसांचे पुण्यात विधान

पुणे : महात्मा जोतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले शेतकरी, कुशल नगररचनाकार आणि यशस्वी उद्योजकही होते. सर्वसामान्य माणसाला अर्थकारण समजावे यासाठी त्यांनी त्या काळातच गुंतवणूक आणि बाजार व्यवस्थेची माहिती गीत व कवितांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने खानापूर येथे आयोजित महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या ‘ज्योती-सावित्री’ या अत्याधुनिक शाळेचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, या शाळेतील मुलींचे प्रगल्भ विचार पाहता त्यांच्यात डर्रींळीींळलरळ झर्हीश्रश यांचा वारसा स्पष्टपणे दिसतो. विज्ञान, संशोधन आणि विविध भाषांचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींचे त्यांनी विशेष कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी महात्मा फुले यांच्या कार्यातील उद्योजकतेचा उल्लेख करताना सांगितले की, मुंबईतील महानगरपालिकेच्या इमारतीच्या बांधकामात ते प्रमुख कंत्राटदार होते. मंजूर खर्चापेक्षा कमी खर्चात काम पूर्ण करून त्यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श निर्माण केला. कात्रज बोगदा, येरवडा कारागृह आणि रेल्वे कार्यशाळा अशा विविध प्रकल्पांमध्येही त्यांच्या कार्यकुशलतेची छाप दिसून येते. राज्यात महात्मा फुले यांच्या नावाने एक हजार नवीन कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या धर्तीवर शंभर शाळांमध्ये प्रगत प्रयोगशाळा सुरू केल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे कौतुक केले.

महिलांना संसद व विधानमंडळात तृतीयांश प्रतिनिधित्व देणे, हेच महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारांना खरी मानवंदना ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी शेतीसोबतच शहर नियोजनाबाबतही मोलाचे विचार मांडले होते. पुणे शहराच्या प्रशासनात काम करताना त्यांनी मानवी गरजांना केंद्रस्थानी ठेवून नियोजन केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS