Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगाव शहर पोलिसांनी केला खुनाचा उलगडा

माजलगाव प्रतिनिधी - शहर पोलिस ठाण्यात काल अनिल शेंडगे याचा अनोळखी लोकांनी खून केल्याची तक्रार दाखल झाली होती. खून केल्याची वेळ ही गुरुवारी रात्र

चोपडा तालुक्यात ज्वारी काढणीला सुरुवात, पावसाचं वातावरण पाहून शेतकरी ज्वारी काढण्यात मग्न 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा निर्णय
अभिनेता करण वाही याला जीवे मारण्याची धमकी ; साधूंविषयी कमेंट पडली महागात | Lok News24

माजलगाव प्रतिनिधी – शहर पोलिस ठाण्यात काल अनिल शेंडगे याचा अनोळखी लोकांनी खून केल्याची तक्रार दाखल झाली होती. खून केल्याची वेळ ही गुरुवारी रात्री साडे आठ वाजेची होती. त्यावेळी लाईट गेलेली होती आणि बाहेर पाऊस चालू होता. लोक रस्त्यावर नव्हते आणि कोणीच ही घटना पाहिल्याचे निदर्शनात येत नव्हते. विशेष म्हणजे यातील पीडित हा अतिशय चांगल्या वर्तनचा आणि कोणाशी देणे घेणे नसलेला,  कोनाशी दुश्मन नसलेला होता तो काही महिन्यापूर्वीच शाळेमध्ये शिपाई म्हणून कामाला लागलेला होता. खून साठी मार लागलेली जखम सुद्धा किरकोळ स्वरूपाची दिसत होती. यामुळे खून कोणी का आणि कसा केला ही काही बाब समोर येत नव्हती यामुळे पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे आणि खून उलगडण्याचे आव्हान तयार झाले होते.
   परंतु पोलिसांनी तपासाची चक्री वेगाने फिरवली यात पोलिसांनी आपल्या मोबाईलवर खुनातील आरोपीची माहिती देण्याचे आवाहन स्टेटस ठेवून केले होते याचा उपयोग झाला आणि नाव न सांगण्याच्या अटीवर एकाने पोलिसांना घडलेली सगळी हकीकत सांगितली. त्यातून पुढे आलेली माहिती अशी यातील प्रमुख आरोपी तेजस शिंदे हा त्याच्या घरी बाळाला काहीतरी औषध घेऊन मेडीकल वर चालला होता त्याच्यासोबत सोन्या राऊत हा सुद्धा होता त्यावेळी त्यांने यातील अरुण शेंडगे यांच्या घरासमोर त्याच्या मोटारसायकलचा धक्का लागला यावरून यातील आरोपी तेजस शिंदे याने पीडित अरुण शिंदे यास शिवीगाळ केली. यामुळे अरुण शिंदेने चिडून तेजस शिंदेला दोन थोबाडीत मारल्या. याचा राग तेजसला आल्यामुळे त्यांनी त्याचा लहान भावास बोलाऊन घेतले. लहान भाऊ पल्सर गाडीवर आला आणि सोबत अजून एक मित्र घेऊन आला आणि तिथे मग दगडाने ठेचून त्यांनी यातील पीडित यास मारले.  त्याचा तेथे जागीच मृत्यू झाला हे पाहून तिथून चाघे पळून गेले. नंतर पिडिताचे वृध्द आई गोंधळ ऐकून खाली आली. तिने रिक्षात टाकून पीडितास दवाखान्यात नेले. तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले.  यातली वरील सर्व चारही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आणखी यात कोण सहभागी आहेत . आणखी काही हत्यार वापरले आहे काय. यातील आरोपी यांची गुन्हेगारी  पार्श्वभूमी तपासणे आहे. ते कोण कोणाशी संपर्कात होते काय , आणखी काही कारण आहे काय हे तपासणे आहे. यासाठी चार दिवस झउठ घेण्यात आली. इतर मारहाण करणारे दोन हे बाल आहेत. माजलगाव शहर पोलीस आवाहन करते की कोणी दादागिरी करत असेल तर आम्हास माहिती द्या किंवा रीतसर तक्रार तरी करावी .

COMMENTS