प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘विकसित भारत युवा कनेक्ट 2.0’ या उपक्रमांतर्गत ‘नशामुक्त भ

प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘विकसित भारत युवा कनेक्ट 2.0’ या उपक्रमांतर्गत ‘नशामुक्त भारत’ अभियान राबविण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी नशामुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना नशामुक्तीची शपथ इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. रामरूले यांनी दिली. प्रमुख पाहुणे डॉ कलाणे के के यांनी म्हटले की,युवकांनी व्यसनांपासून दूर राहून स्वतःचे आरोग्य, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य यांना प्राधान्य द्यावे, तसेच समाजामध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती निर्माण करावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.विकसित भारत युवा कनेक्ट 2.0 अंतर्गत देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे महाविद्यालयात थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमातून देशाच्या विकासात युवकांची भूमिका, युवकांचे सामाजिक दायित्व आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक सहभागाचा संदेश विद्यार्थ्यांना मिळाला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी या थेट प्रक्षेपणास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे डॉ. जाधव एस. एच. अध्यक्षीय त्यांनी मार्गदर्शनातून युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजाच्या विकासामध्ये सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये तंबाखू, गुटखा, सिगारेट, तसेच इतर अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर, शिक्षणावर, कुटुंबव्यवस्थेवर आणि सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे नशामुक्त भारताची संकल्पना केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विशेषतः युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून आपल्या मित्रपरिवारात, कुटुंबात आणि समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. इनकर विक्रम यांनी केले.तर उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मुजावर एस. टी. यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS