Homeताज्या बातम्या

अमृतसर एक्सप्रेसच्या डब्यात सापडलेल्या मानवी पायाचे गूढ १० दिवसांनंतरही कायम; जीआरपीकडून तपास सुरु

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे अमृतसरवरून आलेल्या ट्रेन क्रमांक ११०५८ च्या डब्यात मानवी पाय सापडल्याने एकच खळबळ उ

झुरळाने हुकूमशहाला देखील हरवले…; उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत उत्साह
नांदेड पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडक प्रहार; ’मास रेड’मध्ये ३६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
अंबाजोगाईत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

गाडी नंबर 11058... 1660 किमीचा प्रवास, मुंबईत येताच डब्यात सापडले मानवी पाय,  प्रचंड खळबळ; 10 दिवसानंतरही... - Marathi News | Mumbai Train Mystery: Human  Foot Found in CSMT Express ...

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे अमृतसरवरून आलेल्या ट्रेन क्रमांक ११०५८ च्या डब्यात मानवी पाय सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या धक्कादायक घटनेला १० दिवस उलटून गेले तरीही या मर्डर मिस्ट्रीचे गूढ अद्याप कायम आहे. जीआरपी (रेल्वे पोलीस) कडून या प्रकरणाचा वेगाने तपास केला जात असून, डीएनए चाचणी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अंडरगियर इन्स्पेक्शनदरम्यान उघड झाला प्रकार १७ जुलै रोजी सकाळी ट्रेन नंबर ११०५८ (अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेस) यार्डात आली होती. पहाटे ६ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान यार्डात रुटीन सफाई आणि अंडरगियर इन्स्पेक्शनचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना M2 कोचच्या ट्रॉली आणि व्हील असेंबलीमध्ये गुडघ्यापासून कापलेला एक मानवी पाय फसलेला दिसला. कर्मचाऱ्यांनी तात्काळ जीआरपीला माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून कापलेला पाय फॉरेन्सिक तपासणीसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवला.

अमृतसर ते मुंबई ६०० किमीचा प्रवास आणि प्रश्नचिन्ह ट्रेन १५ जुलैच्या सकाळी अमृतसरहून निघाली होती आणि १७ जुलै रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता मुंबईला पोहोचली. प्रवासादरम्यान कोणतीही धडक झाली नसल्याची किंवा कोणी ट्रेनखाली आल्याची नोंद रेल्वे प्रोटोकॉलनुसार झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी अमृतसरपासून मुंबईपर्यंतच्या सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांना अलर्ट जारी केला असून १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या रेल्वे अपघात किंवा आत्महत्येबाबतची माहिती मागवली आहे.

उत्तर प्रदेशातील ललितपूर कनेक्शनचा संशय तपासादरम्यान पोलिसांना उत्तर प्रदेशच्या ललितपूर येथून एक महत्त्वाचा सुगावा मिळाला आहे. तिथे नुकत्याच झालेल्या दोन रेल्वे अपघातांपैकी एका प्रकरणात मृत व्यक्तीचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले असून त्याचा एक पाय गायब आहे. जीआरपी आता ललितपूरमधील डॉक्टरांकडून अधिक माहिती घेत असून ब्लड सँपल आणि आवश्यकता भासल्यास डीएनए चाचणीद्वारे रक्ताची खातरजमा करणार आहे. दुर्घटनेत पाय कापला जाऊन तो अंडरकॅरेजमध्ये अडकून इतक्या लांब आला असावा, या शक्यतेसह इतर सर्व बाजूंनी पोलीस अधिकारी तपास करत आहेत.

COMMENTS