Homeताज्या बातम्या

पाटोद्यात आज सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन; विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन

पाटोदा: देशातील प्रसिद्ध वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक समर्थन देत पाटोदा तालुक्यातील विविध चळवळीतील कार्यकर्ते, स

आज २७ वी भव्य चालण्याची स्पर्धा; २८ जूनला रत्नेश्वरी पदयात्रा व बीजरोपण अभियान
चांदणी चौकात वाहतूक नियमभंगाविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; नियम तोडणाऱ्या वाहनचालकांकडून ९,७०० रुपयांचा दंड वसूल
नायगाव तालुक्यात पावसाची हजेरी; वादळी वार्‍याने बळेगावात झाडे कोसळली, विजेचा खांब पडल्याने प्रवाशांमध्ये घबराट

पाटोदा: देशातील प्रसिद्ध वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक समर्थन देत पाटोदा तालुक्यातील विविध चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सोमवारी (दि. २० जुलै २०२६) उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शांततामय निदर्शने केली. यावेळी उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत केंद्र सरकारला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आंदोलनकर्त्यांवर कोणत्याही प्रकारची दडपशाही करू नये, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, राम मंदिर देणगी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली. यावेळी कॉम्रेड महादेव नागरगोजे, भाई विष्णूपंत घोलप, अ‍ॅड. राजेंद्र मस्के, राजाभाऊ भोसले, शिवभुषण जाधव, राहुल जाधव, मुकुंद शिंदे, गणेश कवडे, सय्यद शफावोद्दीन, शेख इम्रान नुर, शेख इलियास, नाईकवाडे मामा, संतोष घाडगे, पठाण युसुफ, सय्यद गणी यांच्यासह पाटोदा तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, चळवळीतील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS