Homeताज्या बातम्या

बीड बस स्थानकावरील महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; शिवाजीनगर पोलिसांची रंगेहात धडक कारवाई, दोन महिला अटकेत

बीड : बीड येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिला प्रवाशांच्या पर्स, मोबाईल, रोकड व दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध

शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; घरफोडीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघड
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; बीड जिल्ह्यात एकाच दिवशी ३ ठिकाणी छापे, १२ लाखांचा गुटखा जप्त
घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद; बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस

बीड : बीड येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात महिला प्रवाशांच्या पर्स, मोबाईल, रोकड व दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (DB Team) पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत दोन महिला चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे विशेषतः महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास एक महिला प्रवासी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत दोन संशयित महिलांनी तिला धक्काबुक्की केली आणि तिच्या हातातील पर्स हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने बस स्थानकावर तैनात पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेत दोन्ही महिलांना जागीच पकडले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिला अत्यंत चलाखीने सामान्य वेशात गर्दीत मिसळून महिलांचे लक्ष विचलित करून चोऱ्या करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम आणि शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये एएसआय संतोष राऊत, रवींद्र आघाव, ज्ञानेश्वर मराडे, सचिन आगलावे व पथकाने भाग घेतला. विशेषतः महिला पोलीस जमादार मीरा पाटील यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. “प्रवाशांनी गर्दीत प्रवास करताना दागिने व पैशांबाबत सतर्क राहावे; संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले आहे.

COMMENTS