Homeताज्या बातम्या

आषाढी वारीमुळे एसआयआर नोंदणीला मुदतवाढ द्या; ग्रामीण युवक संघटनेची निवडणूक आयोगाकडे मागणी

बीड: आषाढी वारीसाठी महाराष्ट्रभरातील लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले असून, या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या एसआयआर (SIR - Special Intensive

मुंद्रा पोर्ट ड्रग्ज प्रकरणात ‘ईडी’ची मोठी कारवाई; राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी छापेमारी
मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची एजी कार्यालयामार्फत होणार राज्यस्तरीय चौकशी; विशेष टास्क फोर्स स्थापन होणार
पीएमएफएमई योजनेतून महिला बचत गटांना उद्योगाचे बळ; प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रांचे वाटप: सभापती आरती बनसोडे

बीड: आषाढी वारीसाठी महाराष्ट्रभरातील लाखो वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले असून, या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या एसआयआर (SIR – Special Intensive Revision) मतदार नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेने भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, आषाढी एकादशी २५ जुलै रोजी असून, या दिवशी राज्यभरातून आलेल्या सर्व दिंड्या पंढरपूर येथे एकत्र येतात. वारी सोहळा पार पडल्यानंतर वारकर्‍यांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी साधारण आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे लाखो मतदार आपल्या गावाबाहेर असल्याने त्यांना सध्या सुरू असलेल्या एसआयआर नोंदणी प्रक्रियेत वेळेत सहभागी होणे शक्य होणार नाही.

सध्या राज्यभरात मतदार नोंदणीची एसआयआर प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र तिची अंतिम मुदत आणि आषाढी वारीचा कालावधी एकाच वेळी आल्यामुळे वारीत सहभागी झालेल्या लाखो भाविकांना गणना प्रपत्र भरणे कठीण झाले आहे. परिणामी, अनेक मतदार या महत्त्वपूर्ण नोंदणी प्रक्रियेपासून वंचित राहण्याची आणि भविष्यात त्यांच्या मतदानाच्या हक्कावरही परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला मतदार नोंदणीची समान संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या आषाढी वारीचा विचार करून भारतीय निवडणूक आयोगाने एसआयआर नोंदणी प्रक्रियेला तातडीने मुदतवाढ द्यावी, जेणेकरून वारीहून परतल्यानंतर सर्व भाविकांना आपली नोंदणी प्रक्रिया सुरळीत पूर्ण करता येईल, अशी आग्रही मागणी प्रा. बबनराव आंधळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

COMMENTS