शेवगाव : गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेच्या वतीने प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या १०७ व्या जयंतीनिमीत्त अध्यात्मिक व सामाजिक राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाले. या वर्षीचा अध्यात्मिक पुरस्कार श्रीनाथ शक्ति विदयापीठ अकोला येथील नरेंद्रनाथ महाराज यांना तर सामाजिक पुरस्कार अमरावती येथील निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे, अमरावती येथील मतीन भोसले, ठाणे येथील सेवा निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद हटोटे यांना जाहीर झाले आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके व सचिव फुलचंद रोकडे यांनी दिली. गुरुदत्त सामाजिक संस्थेच्या वतीने सन २०१० पासून दरवर्षी अध्यात्मिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना अध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार देवून गौरवण्यात येते. ११ हजार रुपये रोख,स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून शुक्रवार दि.१ मे रोजी दुपारी ४ वाजता दादाजी वैशंपायन नगर येथील सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राम महाराज झिंजुर्के, आ. मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले, शरद वैशंपायन, मुख्याधिकारी विजया घाडगे, अनुदीप दिघे, डॉ.महेंद्र गौशाल, उदयोजक गिरीश साठे, नगराध्यक्षा माया मुंढे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, अरुण लांडे, नंदकुमार शेळके, रविंद्र पुसाळकर, प्रा.कचरदास सारडा, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, संजय फडके, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, राहुल जावळे, ऍड. अभिजीत काकडे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी भाविकांसह नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

शेवगाव : गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक , शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेच्या वतीने प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या १०७ व्या जयंतीनिमीत्त अध्यात्मिक व सामाजिक राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाले. या वर्षीचा अध्यात्मिक पुरस्कार श्रीनाथ शक्ति विदयापीठ अकोला येथील नरेंद्रनाथ महाराज यांना तर सामाजिक पुरस्कार अमरावती येथील निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे, अमरावती येथील मतीन भोसले, ठाणे येथील सेवा निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद हटोटे यांना जाहीर झाले आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके व सचिव फुलचंद रोकडे यांनी दिली.
गुरुदत्त सामाजिक संस्थेच्या वतीने सन २०१० पासून दरवर्षी अध्यात्मिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना अध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार देवून गौरवण्यात येते. ११ हजार रुपये रोख,स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून शुक्रवार दि.१ मे रोजी दुपारी ४ वाजता दादाजी वैशंपायन नगर येथील सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी राम महाराज झिंजुर्के, आ. मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले, शरद वैशंपायन, मुख्याधिकारी विजया घाडगे, अनुदीप दिघे, डॉ.महेंद्र गौशाल, उदयोजक गिरीश साठे, नगराध्यक्षा माया मुंढे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, अरुण लांडे, नंदकुमार शेळके, रविंद्र पुसाळकर, प्रा.कचरदास सारडा, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, संजय फडके, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, राहुल जावळे, ऍड. अभिजीत काकडे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी भाविकांसह नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS