Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव: २५० कामगारांची आरोग्य तपासणी संपन्न

शेवगाव : येथील लोकमान्य हॉस्पिटल व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या विद्यमाने शनिवारी (दि. ९) आरोग्य तपासणी शिबिर शेवगाव ये

शेवगावात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; तिघांविरुद्ध गुन्हा
शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त, विक्रेत्यांत खळबळ
शेवगावमध्ये २९ मे पासून श्री चैतन्य नवनाथ महाराज संगीतमय कथा सोहळा

शेवगाव : येथील लोकमान्य हॉस्पिटल व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या विद्यमाने शनिवारी (दि. ९) आरोग्य तपासणी शिबिर शेवगाव येथे संपन्न झाले. या शिबिरात इमारत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य अशा २५० जणांनी सहभाग नोंदवत मोठा प्रतिसाद दिला.

येथील शेवगाव-पैठण रस्त्यालगतच्या नियोजित लोकमान्य हॉस्पिटल इमारतीमध्ये हे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक डॉ. गणेश चोखे, डॉ. किरण वाघ, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश जरांगे, मॅनेजर गणेश भोंडे, विलास चोखे, समर्थ देशमुख आदींच्या उपस्थितीत या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले.

सर्व नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण मोफत आरोग्य तपासणी व लिव्हर तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हा समन्वय अधिकारी सविता आढाव म्हणाल्या की, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून आरोग्य तपासणी ते उपचार हे वयाच्या ७५ वर्षांपर्यंत मिळणार आहेत. शासनाने आरोग्याच्या सुविधा व तालुका ठिकाणी मोठी-मोठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध करून दिली आहेत. अनेक बांधकाम कामगार या सुविधांचा लाभ घेत आहेत. कामगारांनी स्वतःची तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. तुषार पाटील, डॉ. तेजल गाडेकर मेडिकल तज्ज्ञ टीम यांनी सुवर्णा, गायत्री, कुसुम, प्राजक्ता, वैष्णवी व रोहित इत्यादी वैद्यकीय पथकाने शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. शिवरत्न कन्स्ट्रक्शनचे अतिष सोनवणे, बांधकाम सनियंत्रण समिती सदस्य बाळासाहेब घटविसावे, पर्यवेक्षक मारुती भिंगुरे, एक्झिक्युटीव्ह विश्वास टोंबे आदी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS