Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीना नदी पूर नियंत्रण रेषेसाठी विचार मंचाची स्थापना

अहिल्यानगर : शहरातून वाहणाऱ्या सीना नदी तसेच संबंधित नाल्यांच्या पूरनियंत्रण रेषेमुळे बाधित झालेल्या जमीन व प्लॉटधारकांच्या प्रश्नांसाठी शहराचे आ

‘प्रवरा’तील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प : जलसंपदा मंत्री विखे पाटील ; ‘गोदा ते नमर्दा’ जलयात्रेनिमित्त निर्धार
‘एक मूठ धान्य अनाथांसाठी’ उपक्रम कौतुकास्पद : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी
नगर : सीना नदी डिजिटल मॅपिंगचे काम पूर्ण

अहिल्यानगर : शहरातून वाहणाऱ्या सीना नदी तसेच संबंधित नाल्यांच्या पूरनियंत्रण रेषेमुळे बाधित झालेल्या जमीन व प्लॉटधारकांच्या प्रश्नांसाठी शहराचे आमदार संग्राम जगताप  यांच्या मार्गदर्शनाखाली “सीना नदी पूरनियंत्रण रेषा विचार मंच”ची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांतील नागरिक, प्लॉटधारक आणि व्यापाऱ्यांच्या वाढत्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर हा मंच स्थापन करण्यात आला असून, यासाठी पहिली बैठक पार पडली.
सन २०१९ साली राज्य सरकारकडून  सीना नदीच्या दोन्ही काठांवर पूरनियंत्रण रेषेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. शहरातील अनेक भागांतील सुमारे ३० टक्के बांधकामयोग्य क्षेत्र बाधित होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. बोल्हेगाव ते बुरुडगाव परिसरातील शेकडो जमीनधारक व प्लॉटधारकांनी आपल्या व्यथा स्थानिक नगरसेवकांसमोर मांडल्या होत्या. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी एकत्र येत आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले.
 यापूर्वीही या विषयावर शासनदरबारी पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र सरकार बदलल्यानंतर हा प्रश्न पुन्हा नव्याने मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बाधित नागरिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “सीना नदी पूरनियंत्रण रेषा विचार मंच” स्थापन करण्यात आला. या मंचाच्या माध्यमातून शासनाकडे ठोस भूमिका मांडून न्याय मिळवण्यासाठी संघटित लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.  बैठकीला जवळपास तीनशेहून अधिक प्लॉटधारक उपस्थित होते.
 अहिल्यानगर शहरातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यलय येथे याची बेठक पार पडली. यावेळी माजी महापौर भगवान फुलसोंदर, किशोर डागवाले , ऍड. अभय आगरकर ,उपमहापौर धनंजय जाधव, अनिल बोरुडे , दत्ता गाडळकर, महेश लोंढे, अभिजित बोरुडे ,पुष्कर कुलकर्णी आदींसह  विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या मांडत चुकीच्या पूरनियंत्रण रेषेमुळे होणाऱ्या आर्थिक व मानसिक नुकसानीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
 या बैठकीस तज्ज्ञ म्हणून आर्किटेक्ट इंजिनिअर असोसिएशनचे स्थापत्य अभियंता संजय पवार आणि प्रकाश जैन यांना आमंत्रित करण्यात आले होते. अभियंता संजय पवार यांनी पूरनियंत्रण रेषेचे तांत्रिक पैलू, त्याचा नागरिकांवर होणारा परिणाम तसेच शासनस्तरावर कोणत्या पद्धतीने लढा द्यावा लागेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रकाश जैन यांनीदेखील पूरनियंत्रण रेषेच्या सद्यस्थितीचे विश्लेषण करत अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले.
  शरद ठाणगे, अभय आगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत या लढ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.  नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत हा प्रश्न केवळ काही भागापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहराच्या विकासाशी संबंधित असल्याचे अधोरेखित केले. विचार मंचाच्या माध्यमातून पुढील काळात व्यापक जनआंदोलन  उभारण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.

COMMENTS