Homeताज्या बातम्या

चार महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नगर नाका ते सूर्या लॉन्स कॅनल रोडवरील खड्डे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवरनगरसेवक मंगेश धोंगडे व अ‍ॅड.नागेश तांबारे यांनी रात्रभर उभे राहून काम करून घेतले

बीड शहरातील नगर नाका ते सूर्या लॉन्स कॅनल रोड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्य

भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी घटनेनंतर महामार्गालगत विहिरींचा  प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ! आतातरी प्राधिकरण आणि प्रशासनाला जाग येणार का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे


बीड शहरातील नगर नाका ते सूर्या लॉन्स कॅनल रोड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, शासकीय कर्मचारी तसेच विविध भागांतून ये-जा करणारे वाहनचालक प्रवास करतात. मात्र मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली होती. अनेक नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या. परिसरातील रहिवासी, व्यापारी आणि वाहनचालकांकडून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने होत होती. या गंभीर प्रश्नाची दखल घेत मा. डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर व गटनेत्या डॉ. सारिका ताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मंगेश धोंगडे व ड. नागेश तांबारे यांनी मागील चार महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी, बीड तसेच बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदने सादर करण्यात आली. संबंधित अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन रस्त्याची प्रत्यक्ष परिस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. सततच्या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने अखेर या प्रश्नावर कार्यवाही सुरू केली. नागरिकांना वाहतुकीदरम्यान कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा यासाठी रात्री 11.00 वाजल्यापासून पहाटे 03 वाजेपर्यंत युद्धपातळीवर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. संबंधित यंत्रणांनी धोकादायक ठिकाणांची पाहणी करून प्राधान्याने दुरुस्ती केली. यावेळी नगरसेवक मंगेश धोंगडे व ड. नागेश तांबारे यांनी पहाटे 3 वाजेपर्यंत स्वतः उभे राहून काम पूर्ण करून घेतले. कामाचा दर्जा उच्च दर्जाचा राहावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कोणतीही तडजोड होऊ नये याबाबत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. नगर नाका ते सूर्या लॉन्स कॅनल रोड हा मार्ग शहरातील अनेक भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने या रस्त्याची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक होते. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर अखेर कार्यवाही सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या कार्यवाहीमुळे हा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांबाबतही अशाच पद्धतीने पाठपुरावा करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS