Homeताज्या बातम्या

कोल्हापुरात तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणारे चारही नराधम गजाआड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आल

विशेष मोहिमेत श्रीगोंदा पोलिसांची मोठी कारवाईअजामीनपात्र वॉरंटमधील २१ आरोपी अटकेत; अनेकांची तुरुंगात रवानगी
कोल्हापुरात माजी सरपंच महिलेची हत्यामृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी अटकेत
केज-अंबाजोगाई रोडवरील लूटमार प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा; दोन दरोडेखोर जेरबंद
रेल्वेमार्गाने येणार्‍या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! - सकल हिंदु  समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन - सनातन प्रभात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी या पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो समाजमाध्यमांवर (Social Media) व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत राधानगरी येथील आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील आणि रणजीत मुधोळकर या चार संशयित आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या चारही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS