Homeताज्या बातम्या

‘मातेची थोरवी आणि कृतज्ञता जपण्यात मोठेपणा’ : ह.भ.प. कृष्णानंद महाराज

श्रीरामपूर : आई-वडिलांचे उपकार कधीही फिटणारे नसतात. भारतीय संस्कृती आई-वडिलांना दैवत मानते, त्यात मातेचा महिमा श्रेष्ठ आहे. तिची थोरवी व कृतज्ञता

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड शहरातील प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद; हजारो विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
NEET आंदोलन: ‘व्हिडिओ पाहण्यात रस नाही, वेळ वाया घालवू नका’; सुप्रीम कोर्टाने वकिलाला सुनावले
राजीनामा झाला; आता पुढे काय ?

श्रीरामपूर : आई-वडिलांचे उपकार कधीही फिटणारे नसतात. भारतीय संस्कृती आई-वडिलांना दैवत मानते, त्यात मातेचा महिमा श्रेष्ठ आहे. तिची थोरवी व कृतज्ञता जपण्यातच मोठेपणा आहे, असे विचार गोखलेनगर येथील साई विठ्ठल अनाथ विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक, अध्यक्ष ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील अतिथी कॉलनीतील समाजमंदिर व्यासपीठावर ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांच्या मातrequested चंद्रभागा व्यवहारे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त प्रवचन, अन्नदान आणि खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ह.भ.प. कृष्णानंद महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. डॉ. बाबूराव उपाध्ये यांनी उपस्थितांचा परिचय करून देऊन सर्वांना ‘वाचता वाचता’ हे पुस्तक भेट देऊन सन्मानित केले.

संयोजक प्राचार्य सुभाष लिंगायत यांनी स्वागत व प्रास्ताविक करून आपल्या सासूबाई श्रीमती चंद्रभागा व्यवहारे यांचे जीवनचरित्र उलगडून दाखवले. याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, श्रीमती लिंगायत, माजी नायब तहसीलदार दत्तात्रेय रायपल्ली यांनी व्यवहारे व लिंगायत परिवाराच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला. ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांनी लिंगायत व व्यवहारे परिवाराने जपलेली कुटुंब संस्कृती आदर्शवत असल्याचे सांगत, अनाथांसाठी आपल्या घासातील घास देणे ही दानसंस्कृती सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले.

याप्रसंगी अनाथ वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मंथन स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी कु. पूर्वा लिंगायत हिचा ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबूराव उपाध्ये यांनी केले, तर प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आभार मानले.

COMMENTS