Homeताज्या बातम्यादेश

शाहरुख खानने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांची महिलांची घेतली भेट

कोलकाता प्रतिनिधी - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतचं किंग खानच्या उपस

सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला शाहरुख खानने केली धक्काबुक्की
अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला
शाहरुख खानला राजस्थातून अटक

कोलकाता प्रतिनिधी – बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून ‘पठाण’ या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतचं किंग खानच्या उपस्थितीत ‘आयपीएल 2023’मध्ये कोलकाता संघाने घरच्या मैदानावर आरसीबीवर  दणदणीत विजय मिळवला. शाहरुख खानचे विराट कोहलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान किंग खानने कोलकातील अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांचीदेखील भेट घेतली आहे.  कोलकातातील मॅच पाहण्यासाठी शाहरुख खानसह सुहाना खान आणि शनाया कपूरनेदेखील हजेरी लावली होती. स्टेडिअमध्ये त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण सध्या शाहरुख खानचे अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  शाहरुखच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर किंग खानचे अॅसिड हल्लाचा शिकार झालेल्या लोकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शाहरुख खानने काळा शर्ट आणि रिप्ड जीन्स परिधान केलेली दिसत आहे. लाडक्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढताना अॅसिड हल्ल्याचा शिकार झालेल्या मंडळींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. 

COMMENTS