Homeताज्या बातम्या

विद्यार्थ्यांचे प्रश्न पक्षीय नाहीत, देशहित सर्वोच्च! ठाकरे बंधूंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे रविवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ठाकरे बंधूंच्या मुंबईतील जल्लोष मेळाव्यावर जोरदार

आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त सात कर्तृत्ववान महिलांचा महापालिकेकडून गौरव
राज्यात TET चा पेपर फुटला; परीक्षा रद्द करण्याची नामुष्की, भिवंडीतून तिघांना घेतले ताब्यात
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संतप्त; वारा-पाऊस नसतानाही हणेगाव मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
Devendra Fadnavis : ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही?  फडणवीसांचं पहिल्यांदाच मोठं भाष्य; म्हणाले, “गेल्या ३० वर्षांत…” - Marathi  News | Devendra ...

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे रविवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ठाकरे बंधूंच्या मुंबईतील जल्लोष मेळाव्यावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्याऐवजी देशहिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांचे प्रश्न हे कोणत्याही व्यक्तीचे किंवा राजकीय पक्षाचे नसतात. ते संपूर्ण देशाशी संबंधित असतात. या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदनशील भूमिका घेत आवश्यक निर्णय घेतले आहेत, त्यामुळे या प्रश्नांकडे राजकीय चष्म्यातून पाहणे योग्य ठरणार नाही.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘भारत विरुद्ध भारतीय जनता पक्ष’ या संघर्षाच्या वक्तव्यालाही फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे गेल्या दहा वर्षांपासून अशा प्रकारची विधाने सातत्याने करत आहेत. मात्र, अशा विधानांचा जनतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. देशातील नागरिकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर कायम असून भारत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. विरोधकांनी संवेदनशील विषयांवर राजकीय भूमिका घेण्याऐवजी रचनात्मक सहकार्य करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे हित, देशाचा विकास आणि राष्ट्रीय हित हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

‘मी महाराष्ट्रातच राहणार’; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

केंद्र सरकारमधील शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले होते. परिणामी, मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रात मोठे पद मिळण्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, “मी महाराष्ट्रातच राहणार” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने केंद्रात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आपण महाराष्ट्रातच राहून राज्याची जबाबदारी पुढेही पार पाडणार असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

COMMENTS