Homeताज्या बातम्या

बबनराव गिरी यांचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मान; निमगाव वाघा येथील सोहळ्यात गौरव

देवळाली प्रवरा : शिक्षण, समाजसेवा, साहित्य आणि अध्यात्म या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे माध्यमिक शिक्षक बबनराव बाबुराव गिरी यांना श्री नवनाथ

चकलांबा येथे भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलची बस सेवा सुरू; पालकांकडून शाळेचे आभार
ढेकणमोहा येथील गोरक्षनाथ विद्यालयाच्या प्राचार्यपदी संजय बडे सर यांची निवड
राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय शेकटा शाळेची दहावी निकालात यशस्वी परंपरा कायम

देवळाली प्रवरा : शिक्षण, समाजसेवा, साहित्य आणि अध्यात्म या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे माध्यमिक शिक्षक बबनराव बाबुराव गिरी यांना श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सन २०२६ चा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. निमगाव वाघा येथे आयोजित हरिनाम सप्ताह सोहळ्यात हभप विकासानंद मिसाळ महाराज यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

बबनराव गिरी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी एमपीएससी (MPSC) परीक्षेच्या माध्यमातून विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असतानाच त्यांनी सामाजिक, साहित्यिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदविला आहे. ग्रामीण भागात प्रवचनांच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्य ते सातत्याने करीत आहेत.

त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत श्री नवनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप विठ्ठल महाराज फलके यांच्या पुढाकारातून हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी हिवरा येथील सोमनाथ अमृत महाराज, सत्यप्रेम गिरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बबनराव गिरी यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, मोहटादेवी ट्रस्टचे माजी सदस्य श्रीधर गिरी गुरुजी, माजी पोलीस निरीक्षक अनिल भारती, मजले चिंचोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक गोरक्षनाथ गिरी तसेच अरुणा गिरी महाराज यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS