Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

मुंबई : जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून पदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन येथे मंगळवारी झालेल्या सोहळ्यात त्यांचा शपथविधी

विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये होणार स्थापनमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
बळीराजा संकटात! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा

मुंबई : जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून पदाची शपथ घेतली. मुंबईतील लोकभवन येथे मंगळवारी झालेल्या सोहळ्यात त्यांचा शपथविधी पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिष्णू देव वर्मा यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करण्याची भूमिका व्यक्त केली. शपथविधी सोहळा साध्या पण उत्साही वातावरणात पार पडला. यापूर्वी सोमवारी जिष्णू देव वर्मा हे पत्नी सुधा देव वर्मा यांच्यासह मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राम शिंदे, आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS