Homeताज्या बातम्या

शिवमहापुराण सप्ताहाची महाप्रसादाने उत्साहात सांगताशिवमहापुराण श्रवणाने पापांचा परिहार; गोदावरी तीरावर कथा ऐकण्याचे विशेष महत्त्व – शिवम शुक्ल महाराज

नांदेड : विष्णुपुरी येथील पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर श्री सत्संग सेवा समिती काळेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा सप्त

भव्य शोभायात्रेने संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथी सोहळ्याची थाटात सुरुवात; निनगुर गावात काय वाजत गाजत… बंकटस्वामींचा सोहळा गाजत..! जयघोषाने परिसर दुमदुमला
श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये लोटला जनसागर; 1.5 लाख भाविकांची उपस्थितीसंत बंकटस्वामींच्या 82व्या पुण्यतिथी उत्सवाची थाटात सांगता
रविवारी करंजीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

नांदेड : विष्णुपुरी येथील पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर श्री सत्संग सेवा समिती काळेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथा सप्ताहाची शनीवारी महाप्रसादाने भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात सांगता झाली. सात दिवस चाललेल्या या आध्यात्मिक ज्ञानयज्ञात हजारो भाविकांनी सहभागी होऊन शिवकथेचा लाभ घेतला. सप्ताहाच्या समारोपप्रसंगी आंतरराष्ट्रीय कथाप्रवचक तथा शिवमहापुराण विशारद श्री शिवम शुक्ल महाराज यांनी शिवमहापुराणाचे महत्त्व, गोदावरी नदीचे पावित्र्य तसेच भगवान श्रीराम, श्रीहनुमान आणि द्वादश ज्योतिर्लिंगांचे आध्यात्मिक महत्त्व यावर सखोल विवेचन केले.
यावेळी बोलताना श्री शिवम शुक्ल महाराज म्हणाले की, शिवमहापुराणाचे श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा परिहार होतो. भगवान शिवांच्या कृपेने जीवनात रिद्धी-सिद्धी, सुख, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. ज्या घरात शिवभक्ती असते त्या घरात धन-धान्याची कधीच कमतरता भासत नाही. शिवकथेच्या प्रभावाने कुटुंबात आनंद, ऐश्वर्य आणि समाधान नांदते. श्रद्धा आणि भक्तिभावाने भगवान शंकरांची आराधना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. अपत्यप्राप्तीची इच्छा असलेल्या दांपत्यांनाही शिवकथेच्या पुण्याईमुळे आणि भगवान शंकरांच्या कृपेने अपत्यसुख प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले. गोदावरी नदीच्या महात्म्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीत गोदावरी नदीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी स्थान प्राप्त आहे. गोदावरीच्या नाभीस्थानी शिवमहापुराण कथा श्रवण करणे हे विशेष फलदायी मानले जाते. या पवित्र स्थळी कथा ऐकल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होऊन आत्मिक शुद्धी प्राप्त होते. सर्व नद्यांमध्ये गोदावरी नदी श्रेष्ठ असून तिचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अतुलनीय आहे, असेही त्यांनी नमूद केले. समारोपाच्या दिवशी महाराजांनी भगवान श्रीराम आणि परमभक्त श्रीहनुमान यांच्या दिव्य नात्याचेही भावपूर्ण वर्णन केले. श्रीराम हे धर्म, सत्य, मर्यादा आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहेत, तर श्रीहनुमान हे भक्ती, सेवा, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तिमंत रूप आहेत. श्रीरामांच्या कार्यासाठी स्वतःचे संपूर्ण जीवन अर्पण करणार्‍या हनुमानांच्या चरित्रातून प्रत्येकाने कर्तव्यनिष्ठा, सेवाभाव आणि भक्तीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांचे महत्त्व विशद करताना त्यांनी भगवान शिवांच्या ज्योतीस्वरूप प्राकट्याची माहिती दिली. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वरम आणि घृष्णेश्वर या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन, स्मरण आणि पूजन केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच आध्यात्मिक शक्ती आणि आत्मिक समाधान प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण सप्ताहभर शिवनामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात कथा पार पडली. समारोपानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत सप्ताहाची भक्तिभावाने सांगता केली. यावेळी काळेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा माजी खासदार भास्करराव  खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोखर्णा, विष्णुपुरी गावचे सरपंच विलास (राजू) हंबर्डे, काळेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी गुरुलिंग स्वामी, शिवाजीराव हंबर्डे, माधव भारती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

COMMENTS