Homeताज्या बातम्या

पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४

https://www.youtube.com/watch?v=ReFpPxuIWaA अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पाथर्डी पोलिसांनी आता अतिशय कठोर पाऊल उचललं आहे. पाथर

पुण्यात विषारी दारूचा तांडव! १५ जणांचा मृत्यू; मुख्य आरोपीसह ८ जणांना बेड्या। लोकमंथन News२४
अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई मोहीम
शिक्षणाच्या माहेरघरात आता ’नशेची’ गंगा? गोकुंद्यात नव्या ’बार’साठी हालचाली; ग्रामपंचायत प्रशासनाची ’अर्थपूर्ण’ डोळेझाक!

अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पाथर्डी पोलिसांनी आता अतिशय कठोर पाऊल उचललं आहे. पाथर्डी पोलिसांच्या एका विशेष पथकाने धडक कारवाई करत शंकरवाडी परिसरातील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय.
पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील गोपाळ वस्ती, शंकरवाडी येथील शिवारात अवैधरित्या गावठी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ३ जून रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोन पंचांसह या ठिकाणी छापा टाकला.

COMMENTS