अकोले नगरपंचायतवर पिचडांनी कमळ फुलवले !, लहामटेंना धक्का

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले नगरपंचायतवर पिचडांनी कमळ फुलवले !, लहामटेंना धक्का

अकोले/प्रतिनिधी : अकोले नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवत भाजपाने नगरपंचायतीवर माजी आमदार मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांनी कमळ

सराफा व्यापार्‍यांचे 30 लाखांचे अर्धा किलो सोनं घेऊन बंगाली कारागीर पसार.!
जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये रंगला दांडिया व गरबा नृत्य
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईला तुम्ही शिवसेनेत स्थान दिलं हे दुर्दैवी 

अकोले/प्रतिनिधी : अकोले नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवत भाजपाने नगरपंचायतीवर माजी आमदार मधुकरराव पिचड व वैभव पिचड यांनी कमळ फुलविले. येथील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांना या निकालाने धक्का दिला आहे.
अकोले नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस अशा लढती झाल्या राज्यात महाविकासआघाडी असताना अकोले तालुक्यात नगरपंचायत मध्ये मात्र आघाडीत बिघाडी झाल्याने भाजपाला कमळ फुलविण्यात यश आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यातच निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर गरळ ओकणे महाआघाडीला भोवले. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणूक चांगलीच रंगली. यामुळे महाविकास आघाडीला नगर पंचायतमध्ये सत्ता स्थापनेपासून दूर जावे लागले आहे. नगरपंचायत निवडणुकीत आघाडीत सामील न होता काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली, पण ही राष्ट्रीय काँग्रेसची अकोल्यात राजकीय आत्महत्या ठरली. काँग्रेसला अवघ्या एका जागेवर खाते खोलता आले तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवत चार जागांवर यश मिळवले. स्वतःचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेसला स्वतःचे हसू करण्याची वेळ आली तर महाविकास आघाडीत राष्ट्रीय काँग्रेसला सोबत न घेता लढण्याचा पश्‍चातापही राष्ट्रवादी-शिवसेनेला करावा लागला. शिवसेनेला दोन आणि राष्ट्रवादीला दोन आशा चार जागांवर समाधान मानाचे मानावे लागले. मनसे आणि माकप यांना तर खातेही खोलता आले नाही. भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी नगर पंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासूनच नियोजनपूर्वक लढाई सुरू ठेवली तर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे उमेदवार जाहीर करेपर्यंत संभ्रमाची स्थिती राहिली. जागावाटपावरून आघाडी फिस्कटली. विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी अखेरपर्यंत खिंड लढवली. मात्र, काँग्रेस मित्रपक्षाच्या मत विभागणीमुळे शिवसेना-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.

प्रभागनिहाय उमेदवार व त्यांना पडलेली मते…
प्रभाग क्र. 1 मधून- सौ. मंडलिक विमल संतु (शिवसेना, 416, विजयी), श्रीमती मंडलिक अलका अशोक (काँग्रेस, 245) व श्रीमती मंडलिक सुरेखा पुंजा (राष्ट्रवादी बंडखोर, 10). प्रभाग क्र. 2 मधून- चौधरी शिवाजी आनंदा (राष्ट्रवादी, 84), चौधरी सागर निवृत्ती (भाजपा, 169, विजयी) व चौधरी सागर विनायक (काँग्रेस, 166). प्रभाग 3 मध्ये- पांडे मंदा तान्हाजी (राष्ट्रवादी, 254), मनकर प्रतिभा वसंत (भाजपा, 481, विजयी), नवले जयश्री दत्तात्रय (मनसे, 51) व शिंदे ठकुबाई पोपट(शिवसेना, 6). प्रभाग 4 मध्ये- मैड श्रीकांत सुधाकर (शिवसेना, 124), हितेष रामकृष्ण कुंभार (भाजपा, 250, विजयी), योगेश मुकुंद जोशी (अपक्ष, 94) व फैजान शमसुद्दीन तांबोळी (काँग्रेस, 153), प्रभाग 5 मध्ये- कानवडे गणेश भागुजी (शिवसेना, 346), नाईकवाडी सोनाली लक्ष्मीकांत (भाजपा, 416, विजयी) व गुजर हर्षल रमेश (मनसे, 7). प्रभाग 6 मध्ये- रुपवते श्‍वेताली मिलिंद (राष्ट्रवादी, 363, विजयी), घोडके शैला विश्‍वनाथ,(भाजपा, 290) व रुपवते कांचन किशोर (काँग्रेस, 28). प्रभाग 7 मध्ये- शेख आरीफ शमसुद्दीन (राष्ट्रवादी,393, विजयी), शेख मैनुद्दीन बद्रोद्दीन (भाजपा, 296), ताजणे सचिन सदाशिव (मा.क.प., 90). प्रभाग 8 मध्ये- गायकवाड अशोक दत्तु (राष्ट्रवादी, 288), वडजे बाळासाहेब काशिनाथ,(भाजपा, 557, विजयी), गायकवाड जयराम विठोबा (शिवसेना बंडखोर, 48), गायकवाड शिवाजी रामनाथ (मनसे,20). प्रभाग 9 मध्ये- रोकडे भीमा बबन (राष्ट्रवादी, 216), वैद्य शितल अमोल (भाजपा, 347, विजयी). प्रभाग 10 मध्ये- शेटे नवनाथ विठ्ठल (शिवसेना, 137 विजयी), नाईकवाडी अनिल गंगाधर ( भाजपा, 92), शेटे मयुर (काँग्रेस, 62), शेणकर संदीप भाऊसाहेब (राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर, 92) व नाईकवाडी प्रकाश संपतराव (अपक्ष, 4). प्रभाग क्र 11 मध्ये- सौ.वंदना भागवत शेटे (राष्ट्रवादी काँग्रेस, 251), सौ.वैष्णवी सोमेश्‍वर धुमाळ (भाजपा, 258, विजयी) व सौ.वनिता रामदास शेटे (काँग्रेस, 140). प्रभाग 12 मध्ये-कुरेशी निलोफर गफ्फार (राष्ट्रवादी, 99), तमन्ना मोहसिन शेख (भाजपा, 423, विजयी), जाधव सुमन सुरेश (काँग्रेस, 24) व पवार अनिता शरद (शिवसेना बंडखोर, 187). प्रभाग क्र 13 मध्ये- सौ.आरती सुरेश लोखंडे (राष्ट्रवादी, 216), सौ.जनाबाई नवनाथ मोहिते (भाजपा, 268, विजयी) व सौ.अंजली स्वप्निल कर्णिक (काँग्रेस). प्रभाग क्र 14 मध्ये- पांडुरंग बाबुराव डमाळे (राष्ट्रवादी, 188), शरद एकनाथ नवले (भाजपा, 267, विजयी) व राजेंद्र यादव नाईकवाडी (काँग्रेस, 252). प्रभाग क्र 15 मध्ये- नाईकवाडी संतोष कारभारी (राष्ट्रवादी, 97), शेटे सचिन संदिप (भाजपा, 190), नाईकवाडी प्रदीपराज बाळासाहेब (काँग्रेस, 322, विजयी) व वर्पे अजय भीमराज (शिवसेना बंडखोर, 3). प्रभाग क्र 16 मध्ये- भांगरे पूजा तुकाराम (राष्ट्रवादी, 92), शेणकर माधुरी रवींद्र (भाजपा, 147 विजयी) व भांगरे मीना प्रकाश (काँग्रेस, 142). प्रभाग क्र 17 मध्ये- पानसरे आशा रवींद्र (राष्ट्रवादी, 156) व शेळके कविता परशुराम (भाजपा, 291, विजयी). अकोले नगर पंचायत पक्षीय बलाबल- भाजप : 12, राष्ट्रवादी काँग्रेस : 2, शिवसेना : 2 व काँग्रेस : 1.

COMMENTS