Homeताज्या बातम्या

घाटसावळीत ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जल्लोषवृद्धाश्रम, व्यसनमुक्ती केंद्र, वृक्षसंवर्धन व विद्यार्थ्यांना मदतीचा हात

बीड : महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटसावळी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्थेच्य

कॅशियरने बारमधील गल्ल्यावर मारला डल्ला; पाहा व्हिडीओ | LokNews24
भारत जोडो यात्रेत दिसणारे जे कलाकार आहेत त्यांना पैसे देऊन आणले आहे 
कोतवाली पोलिस ठाण्यातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव
वडवणी येथे ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त एकल माता मुलींना  सायकल वाटप तसेच विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप माझ्या ...


बीड : महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटसावळी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आईसारखा आधार आणि झाडांसारखी माया या भावनेतून वाढदिवस माणुसकीच्या उत्सवात साजरा करण्यात आला.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम व जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र, घाटसावळी येथे झालेल्या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी भाजप नेते सर्जेराव तात्या तांदळे म्हणाले की, वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे नव्हे, तर गरजूंच्या आयुष्यात आधार बनणे होय. कोणताही बडेजाव न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते देविदास नागरगोजे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, ही संस्था लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेला सामाजिक सेवेचा वारसा पुढे नेत आहे. निराधार आजी-आजोबांना मोफत मायेचा आधार देणे तसेच व्यसनमुक्तीसाठी कार्य करणे हे प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.  कार्यक्रमात भाऊ नाना सुरवसे, भगीरथ आबा बांडे, शामराव राऊत, विनोद तांगडे, अमर सानप आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजीराव भाऊ फड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. संस्थेचे प्रमुख चंद्रकांत बाप्पा फड यांनी प्रास्ताविक केले. नियोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन भैय्या यांनी केले. यावेळी व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण मित्रांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना फळांचे वाटप करण्यात आले. मागील वर्षी वाढदिवसानिमित्त लावलेल्या 3 हजार झाडांना पाणी घालून त्यांचे संवर्धन करण्यात आले. गोशाळेत गायींना गूळ-घास भरवून गोसेवाही करण्यात आली. घाटसावळी येथील जागृत देवस्थान खंडोबा मंदिरात आरती करण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विविध समाजोपयोगी उपक्रमांनी पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजिनाथ शेरकर यांनी केले तर गीताराम गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष खवतड, बारीक कडेकर, रामनाथ मुळे, सहदेव फड, संजय फड, जावळे दादा, गोरख फड, अमोल नेहरकर, संकेत दराडे, सचिन दराडे, वर्षा शेरकर, शशिकला दराडे, वंदना जाधव आदींनी परिश्रम घेतले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS