Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा धरणातून सोडले आर्वतन

देवळाली प्रवरा ः अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाच्या  डाव्या व उजव्या कालव्यातून  शेतीसाठी आवर्तन  सोडण्यात आले आहे. मुळा धरणात

अहमदनगरमध्ये चार बांगलादेशी घुसखोरांना अटक
नगर अर्बन वाचवण्यासाठी भाजप सरसावले ; सत्ताधार्‍यांचे खा. विखेंनंतर मंत्री कराडांना साकडे
शेतीमध्ये सेंद्रीय खतांचे प्रमाण वाढवणे गरजेचे ः डॉ. दुरगुडे

देवळाली प्रवरा ः अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाच्या  डाव्या व उजव्या कालव्यातून  शेतीसाठी आवर्तन  सोडण्यात आले आहे. मुळा धरणात यंदाच्या हंगामात 7 हजार दशलक्ष घनफूटपेक्षा अधिक पाणी शिल्लक राहणार आहे. त्याचा वापर खरीप दिली. हंगामाच्या पिकासाठी करता येणार असल्याची माहिती मुळाधरण शाखा अभियंता शरद कांबळे यांनी दिली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावली. मात्र पडलेला पाऊस जमिनीत जिरल्यामुळे पाण्याची आवक शून्य आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले धरण सलग चार वर्ष पूर्ण क्षमतेने भरले. यंदा धरणात 50 हजार 1999 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची नोंद झाली होती. त्यापैकी 28 हजार द.ल.घ.फु. पाणी जायकवाडीला  सोडण्यात आले. डिग्रस, मानोरी, मांजरी, वाजुंळपोही या बंधार्यातही पाणी सोडण्यात आले. शेतकर्‍यांच्या मागण्यानुसार मुळा उजव्या कालव्यातून आत्तापर्यंत 8 हजार 385 द.ल.घ.फू पाणी खर्च झाले आहे. तर डाव्या कालव्यातून शेतीसाठी 1 हजार 53 द.ल.घ.फू पाणी खर्च झाले आहे. दोन्ही कालव्यातून सध्या आवर्तन  सुरू असून मुळा धरणात  सध्या 15 हजार 372 पाणी शिल्लक आहे. यापैकी यंदाच्या हंगामासाठी 8 हजार द.ल.घ.फु. पाणीसाठ्याचा वापर होऊ शकतो. याशिवाय 4 हजार 500 मृत पाणीसाठा आहे.

COMMENTS