Homeताज्या बातम्या

किनवटमध्ये खळबळ; अवैध लाकूड तस्करांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, दुचाकी लुटून दिली जिवानीशी मारण्याची धमकी

किनवट : तालुक्यातील घोटी वन नाक्यावर अवैध लाकूड तस्करीचे वृत्त संकलन करणारे पत्रकार मोईसर खॉन युसूफ खॉन (वय ४१, रा. शिवाजी नगर, किनवट) यांच्यावर

गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन; नायगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
नांदेड येथे स्वतंत्र ‘एफडीए’ प्रयोगशाळा सुरू करा; शहर विकास समितीची जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबणार कधी?; नांदेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
आलीराजपुर में खैर तस्करी से 'टेरर फंडिंग' का शक, बड़े पैमाने पर अवैध लकड़ी  गुजरात भेजे जाने का दावा, वन विभाग की भूमिका पर सवाल - khair smuggling in  ...

किनवट : तालुक्यातील घोटी वन नाक्यावर अवैध लाकूड तस्करीचे वृत्त संकलन करणारे पत्रकार मोईसर खॉन युसूफ खॉन (वय ४१, रा. शिवाजी नगर, किनवट) यांच्यावर लाकूड तस्करांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास घडली. तस्करांनी पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांची दुचाकी जबरदस्तीने हिसकावून घेतली. या भ्याड हल्ल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत असून तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

पत्रकार मोईसर खॉन हे परिसरातील बेकायदेशीर धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी संशयित आरोपी दिलीप पावडे याच्या अवैध लाकूड तस्करी विरोधात वनविभागाकडे तक्रार करून वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती. याचाच राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. सोमवारी सकाळी मोईसर खॉन घोटी येथील वन नाक्यावर गेले असता, त्यांना तिथे एका ‘आयचर’ गाडीत बेकायदेशीर लाकूड भरलेले दिसले. त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करत असताना मुख्य तस्कर दिलीप पावडे आणि त्याचा मुलगा राहुल दिलीप पावडे यांनी “आमच्या धंद्याची बातमी का लावली?” असे म्हणत त्यांना अश्लील शिवीगाळ सुरू केली.

आरोपींनी पत्रकार मोईसर खॉन यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यांची ‘होंडा शाईन’ मोटरसायकल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. “पुन्हा नादाला लागलात किंवा पोलिसात गेलात तर जिवानीशी खतम करू,” अशी धमकीही तस्करांनी दिली. या घटनेनंतर मोईसर खॉन यांनी तातडीने किनवट पोलीस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. मारहाण, लूटमार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS