Homeताज्या बातम्या

विष्णुपुरीत उद्यापासून ७ दिवसीय भव्य शिवमहापुराण कथा महोत्सवास प्रारंभ; शिवभक्तांसाठी भक्ती आणि अध्यात्माची पर्वणी

नांदेड : विष्णुपुरी येथील श्री सत्संग सेवा समिती, काळेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय भव्य 'शिवमहापुराण कथा महोत्सवास' उद्या

नांदेडमध्ये मुदतबाह्य औषध विक्रीप्रकरणी तोष्णीवाल मेडिकल्सवर मोठी कारवाई; विना बिल आणि विना फार्मासिस्ट सुरू होता कारभार
नीट घोटाळा आणि नांदेड पोलीस भरती प्रकरणाच्या चौकशीसाठी युवक काँग्रेसचा धडक मशाल मोर्चा
कोट्यवधींचा आरोग्य निधी वाया, खाबूगिरीला लगाम; डॉ. संगीता देशमुख निलंबित

नांदेड : विष्णुपुरी येथील श्री सत्संग सेवा समिती, काळेश्वर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय भव्य ‘शिवमहापुराण कथा महोत्सवास’ उद्या रविवार (दि. १४ जून २०२६) पासून प्रारंभ होत आहे. शनिवार (दि. २० जून) रोजी या महोत्सवाचा महाप्रसादाने समारोप होणार आहे. भगवान शिवाच्या महिम्याचे, धर्म-अध्यात्माचे आणि भारतीय संस्कृतीतील संस्कारमूल्यांचे दर्शन घडविणारा हा धार्मिक सोहळा काळेश्वर सत्संग सभागृह, विष्णुपुरी येथे संपन्न होईल.

या महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी सांगितले की, शिवमहापुराण कथा महोत्सवाच्या माध्यमातून समाजात भक्ती, अध्यात्म आणि संस्कारांची जोपासना होण्यास मोठी मदत होणार आहे. भगवान शिवाच्या जीवनातील विविध प्रसंग, त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि भक्तीचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा हा पवित्र प्रयत्न आहे. या महोत्सवात प्रख्यात शिवमहापुराण अभ्यासक व कथाकार ह.भ.प. शिवम शुक्ल महाराज यांच्या ओजस्वी व रसाळ वाणीतून शिवमहापुराणाचे निरूपण केले जाणार आहे.

दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत ही कथा होणार असून, यात शिवमहापुराण माहात्म्य, सती चरित्र, शिव-पार्वती विवाह सोहळा, श्रीगणेश प्राकट्य आणि त्रिपुरासुर वध यांसारख्या भगवान शिवाच्या विविध लीला कथारूपी अमृतातून भाविकांसमोर उलगडल्या जातील. या धार्मिक महोत्सवासाठी श्री सत्संग सेवा समिती, काळेश्वरचे अध्यक्ष खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. पत्रकार परिषदेस माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, धारोजीराव हंबर्डे, राजेंद्र शुक्ला, बालाजीराव हंबर्डे, किशोर उपाध्याय (शर्मा), नवल पोकर्णा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS