Homeताज्या बातम्या

भोकर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट पावत्यांच्या आधारे खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड, फरार आरोपीस अटक

भोकर : शेतकऱ्यांची फसवणूक करून ई-पॉस (e-POS) मशीनशिवाय व बनावट पावत्यांच्या आधारे बेकायदेशीररीत्या खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा भोकर पोलीस व कृषी व

गोदावरी खरोखर प्रदूषणमुक्त?; मनपाच्या दाव्यांवर एनजीटीतील याचिकेमुळे प्रश्नचिन्ह!
वादळाने नुकसानग्रस्त झालेली वीजयंत्रणा तातडीने दुरुस्त करा; आमदार विवेक कोल्हे यांची महावितरणकडे आग्रही मागणी
नळातून पाणी नव्हे, आजारांचा पुरवठा! गांधीनगरमध्ये ६ महिन्यांपासून दूषित पाणी; नागरिकांचा संताप शिगेला

भोकर : शेतकऱ्यांची फसवणूक करून ई-पॉस (e-POS) मशीनशिवाय व बनावट पावत्यांच्या आधारे बेकायदेशीररीत्या खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा भोकर पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे ७ जून २०२६ रोजी भोकर तालुक्यातील मौजे बल्लाळ तांडा येथे कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त छापा टाकला होता. यावेळी शेतकऱ्यांच्या नावाने बनावट पावत्या तयार करून, शासनाच्या ई-पॉस प्रणालीचा वापर न करता खतांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे उघड झाले. या कारवाईत ‘NPL 20:20:0:13’ या खताची ६० पोती आणि अशोक लेलँड कंपनीचे मालवाहू वाहन (क्र. MH-26 BE-9402) जप्त करण्यात आले होते.

या प्रकरणी कृषी अधिकारी प्रमोद माणिक कद्रेकर यांच्या फिर्यादीवरून मुख्य आरोपी बालाजी माणिकराव करंडेकर, संतोष दत्ता उठलवाड (रा. पांडुर्णी, मुदखेड) आणि सुभाष रामेश्वर सोनी (रा. भोकर, फरार) यांच्याविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३(५) सह रासायनिक खते (नियंत्रण) आदेश १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकर पोलीस ठाण्याचे प्रभारी शैलेंद्र औटे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव, विष्णू खिलारे आणि गोपनीय शाखेचे परमेश्वर गाडेकर यांच्या पथकाने केली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS