Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगाव शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास!

नगरपालिका व पोलीस प्रशासनाची कारवाई अतिक्रमण केल्यास होणार कडक कारवाई

माजलगाव प्रतिनिधी - शहरातील महत्त्वाच्या व गजबजलेल्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आली होती याबाबत अनेक वेळा प्रशासनामुळे निवेदन देण्

लोखंडी गावातील गावगुंडा च्या त्रासाला कंटाळून गावकरचे आमरण उपोषण
सिंदी शहरात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा 
लोकशाहीच्या मंदिरातील गोंधळ

माजलगाव प्रतिनिधी – शहरातील महत्त्वाच्या व गजबजलेल्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आली होती याबाबत अनेक वेळा प्रशासनामुळे निवेदन देण्यात आली व प्रसार माध्यमातून अनेक वेळा आवाज उठवण्यात आला होता, मात्र स्वस्त प्रशासनाने याची दखल घेतली नाही. माजलगाव नगरपालिकेचा कारभार नूतन प्रशासक डॉक्टर आदित्य जीवने यांनी हाती घेताच शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील बी अँड सी रोड जुने बस स्थानक,जुना मोंढा,नवीन बसस्टॅन्ड या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती.नगरपरिषदे कडुन 72 तासापूर्वी संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीस काढण्यात आली होती.याची दखल अतिक्रमणधारकांनी घेतली नाही त्यामुळे नगर परिषदेने मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. ही कार्यवाही नगरपरिषदेचे प्रशासकता का आयएएस जीवनेसह पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी सुरू केली आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमणधारकांनी टपर्‍या हादगाडे,पत्र्याची शेड उभारून अतिक्रमण केली होती.या अतिक्रमानामुळे पादचारी नागरिकांसह वाहतुकीसही मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती.याबाबत अनेक वेळेस माध्यमांनीही आवाज उठलला होता.वारंवार नागरिकांमधून ही या रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणाविरोधात ओरड होत होती.परंतु याबाबत प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही करण्यात येत नव्हती.दरम्यान महिन्याभरापूर्वीच नगरपरिषदेचा प्रदभार घेतलेले प्रशासक मुख्याधिकारी आयएएस डॉ.आदित्य जीवने यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष दिले.या मोहिमेसाठी त्यांनी 72 तासापूर्वी संबंधित अतिक्रमण धारकांना रीतसर नोटीसा बजावल्या.परंतु अतिक्रमण धारकांनी त्या नोटीसिना दात दिली नसल्याने स्वतः आयपीएस जीवने आपल्या पूर्ण पालिका टीमसह पोलीस प्रशासनाची मदत घेत रस्त्यावर उतरले.व त्यांनी नवीन बस स्टॅन्ड बी अँड सि रोडवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.दरम्यान यामुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.यावेळी पुन्हा नव्याने अतिक्रमण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची जीवने यांनी सांगितले आहे.

COMMENTS