Homeताज्या बातम्या

प्रदीर्घ अनुभवी विश्वंभर पलेवाड यांनी स्वीकारला भोकर पोलिस निरीक्षक पदभार; गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर कारवाईचे संकेत

भोकर पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक म्हणून   विश्वंभर पलेवाड यांनी 19 जून रोजी पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील गुन्हेगारी

राहात्यात वाढत्या गुन्हेगारीवरून पिपाडा आक्रमकजिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन ; कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी
ओंकार गायकवाड मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा : घोगरे 
वाळू माफियांना संरक्षण प्रकरणी मोठी कारवाईपरभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे नांदेड नियंत्रण कक्षात संलग्न



भोकर पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक म्हणून   विश्वंभर पलेवाड यांनी 19 जून रोजी पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच विविध अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
भोकर शहरासह तालुक्यातील अनेक भागांत  संघटित गुन्हेगारी,अवैध दारू विक्री, गुटखा, मटका, जुगार, अवैध प्रवासी वाहतूक तसेच सागवान तस्करीसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कठोर आणि अभ्यासू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पलेवाड यांच्या आगमनाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पलेवाड यांनी यापूर्वी लातूर येथील गुन्हे अन्वेषण शाखेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच परभणी, नांदेड, उमरी, मुदखेड आणि निमगाव येथेही त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. नांदेड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि गुन्हेगारी परिस्थितीचा त्यांना सखोल अभ्यास असल्याचे मानले जाते. दरम्यान, प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र औटे यांनी अवैध दारू, मटका, बोगस खत तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात धडक कारवाया करून कायद्याचा धाक निर्माण केला होता. त्यांच्या कारवायांमुळे अनेक अवैध व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार व इतर बेकायदेशीर व्यवसायांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. या व्यसनाधीन व बेकायदेशीर धंद्यांच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अशा अवैध धंद्यांवर कठोर अंकुश ठेवून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS