राहाता : शहरातील वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, खून, चोरी, दरोडे आणि अवैध धंद्यांच्या वाढत्या घटनांविरोधात भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी अहिल्यानगरचे मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. यावेळी राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी प्रकरण गांभीर्याने घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.डॉ. पिपाडा यांनी राहाता शहरातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक झाल्याचा आरोप करत, सामान्य नागरिकांना पोलिस ठाण्यात योग्य वागणूक मिळत नसल्याचे म्हटले. “तक्रार घेऊन जाणाऱ्या नागरिकालाच आरोपीप्रमाणे वागणूक दिली जाते, तर गुन्हेगार मोकाट फिरत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या निष्क्रियतेमुळे शहरात गुन्हेगारी वाढल्याचा दावाही त्यांनी केला.निवेदनात काही दिवसांपूर्वी घडलेल्या ओंकार गायकवाड या १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूच्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला. मुलाला वाहनाने चिरडल्याची माहिती पोलिसांना देऊनही दोन दिवस गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला. नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेहासह आंदोलन केल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.राहाता तालुक्यात महिला अत्याचार, छेडछाड, घरफोड्या, दरोडे, अवैध दारू विक्री, मटका, गुटखा तस्करी, मोबाईल चोरी, खिसेकापू टोळ्या आणि दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोपही करण्यात आला. अनेक प्रकरणांत फिर्याद नोंदविण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रारही डॉ. पिपाडा यांनी केली.यावेळी पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कार्यशैलीची सखोल चौकशी करून कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवावी, महिला सुरक्षेसाठी विशेष पथके नियुक्त करावीत तसेच रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.

COMMENTS