Homeताज्या बातम्यादेश

राजस्थानमध्ये ईडीच्या अधिकार्‍याच्या घरीच छापे

जयपूर ः राजस्थानसह इतर राज्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे छापे पडत असतांनाच, आता एका ईडीच्या अधिकार्‍याच्या घरीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागा

ईडीची राज्यभरात छापेमारी
ईडीची बंगाल, तामिळनाडूमध्ये छापेमारी
उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तींयांवर ‘ईडी’चे छापे

जयपूर ः राजस्थानसह इतर राज्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे छापे पडत असतांनाच, आता एका ईडीच्या अधिकार्‍याच्या घरीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकल्यानंतर खळबळ उडाली आहे.
राजस्थानमध्ये काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. तसेच मुख्यमंत्री गहलोत यांचे चिरंजिव वैभव गहलोत यांचीही चौकशी करण्यात आली होती. मात्र, आता राजस्थान एसीबीने ईडीच्या अधिकार्‍यावरच कारवाई केली आहे. त्या अधिकार्‍यावर मध्यस्थी करण्यासाठी 15 लाखाची लाच मागितल्याचा आरोप आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी नवल किशोर मीना यांनी एका प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी 15 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर राजस्थान सरकारच्या तपास संस्थेने या केंद्रीय तपास संस्थेच्या अधिकार्‍याला ताब्यात घेतले आहे. या ईडीच्या अधिकार्‍याने बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा एसीबीला संशय होता. त्यावरून एसीबीने संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आणि अधिकार्‍याला ताब्यात घेतले. राजस्थानमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे निवडणूक काळातच ईडीने काँग्रेसच्या नेत्यांवर धाड टाकल्यामुळे केंद्र सरकार सरकारी संस्थांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप गहलोत यांनी केला होता. काँग्रेसने गरीब, महिला आणि शेतकर्‍यांसाठी जाहिर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले होते.

COMMENTS