देवळाली प्रवरा : बेलापूर बु. येथील कथित भोंदू बाबा गणेश शिंदे याच्या अटकेनंतर आता एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. देवळाली प्रवर

देवळाली प्रवरा : बेलापूर बु. येथील कथित भोंदू बाबा गणेश शिंदे याच्या अटकेनंतर आता एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. देवळाली प्रवरा येथील त्याचा कथित निकटवर्तीय व एजंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका तरुणावर नवविवाहितेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा सुरू असून, आर्थिक व राजकीय दबावामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
माहितीनुसार, देवळाली प्रवरा येथील फोडकर आडनावाच्या एका तरुणाचे नाव या प्रकरणात समोर येत आहे. संबंधित तरुण हा गणेश शिंदे याचा जवळचा सहकारी मानला जात होता. भोंदू बाबाच्या प्रभावाचा वापर करून शेजारी राहणाऱ्या नवविवाहित महिलेशी गैरवर्तन व अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. पीडित महिलेने त्यावेळी राहुरी पोलीस ठाण्यात संबंधित तरुणासह गणेश शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आर्थिक व्यवहार आणि प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे हे प्रकरण पुढे सरकले नाही, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित तरुणाने राहुरी फॅक्टरी परिसरातील काही व्यावसायिकांना गणेश शिंदे यांच्या संपर्कात आणल्याचे बोलले जात आहे. देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी परिसरातील काही व्यावसायिकांनी मिळून शिंदे यांच्यासाठी जागा घेऊन आलिशान बंगला उभारण्यात मदत केल्याची चर्चाही सुरू आहे. या अत्याचार प्रकरणात गणेश शिंदे यांनी मध्यस्थी करत आर्थिक व्यवहारातून विषय मिटविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला जात आहे. या सर्व घडामोडींमुळे देवळाली प्रवरा व राहुरी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, गणेश शिंदे प्रकरणात तपास पुढे सरकत असताना रोज नवनवे दावे आणि आरोप समोर येत आहेत. आगामी चौकशीत आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS