Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अखेेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अमेरिकेची अट

https://www.youtube.com/watch?v=TGIWoGvZZVk वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका-इस्त्राईल यांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला करत युद्ध सुरू केले होते. मात्र ब

ट्रम्प यांच्या दौऱ्यानंतर पुतीनही चीनला जाणार
अखेेर दोन आठवड्यांचा युद्धविराम; होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची अमेरिकेची अट
होर्मुझ सामुद्रधुनीतील भारतीय जहाजांवरील हल्ले अस्वीकारार्ह; भारताने मांडली संयुक्त राष्ट्रांमध्ये ठाम भूमिका

वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका-इस्त्राईल यांनी संयुक्तपणे इराणवर हल्ला करत युद्ध सुरू केले होते. मात्र बुधवारी सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वपूर्ण घोषणा करत दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा केली. या काळात अमेरिका कोणतेही संभाव्य हल्ले आणि बॉम्बहल्ले तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या कालावधीत अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांकडून कोणतीही आक्रमक कारवाई होणार नाही, असा संदेश देण्यात आला आहे.
या युद्धविरामासोबत एक निर्णायक अटही ठेवण्यात आली आहे. होर्मुज सामुद्रधुनी जहाजवाहतुकीसाठी तात्काळ आणि सुरक्षितपणे खुली करणे इराणसाठी आवश्यक ठरवण्यात आले आहे. जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा मार्ग बंद राहिल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतात, याची जाणीव अमेरिकेने स्पष्टपणे करून दिली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने आपल्या अनेक लष्करी उद्दिष्टांची पूर्तता केली असून आता दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेवर भर दिला जात आहे. त्यांच्या मते, इराणकडून दहा मुद्द्यांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून तो चर्चेचा पाया ठरत आहे. दोन्ही देशांमधील जुन्या वादांपैकी अनेक प्रश्‍नांवर प्राथमिक सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पुढील दोन आठवड्यांत अंतिम कराराचा प्रयत्न करण्यात येणार असून, तो यशस्वी ठरल्यास पश्‍चिम आशियातील तणाव कमी होण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. याआधी अमेरिकेकडून इराणला ठराविक मुदतीचे इशारे देण्यात आले होते. सुरुवातीला कमी कालावधीची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली होती, मात्र त्यानंतर ती वारंवार वाढवण्यात आली. शेवटी ही मुदत एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीपर्यंत नेण्यात आली. चर्चेची दारे खुली ठेवत असतानाच, ती अपयशी ठरल्यास कठोर निर्णय घेण्याची तयारी असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. या संपूर्ण घडामोडींची पार्श्‍वभूमीही तितकीच गंभीर आहे. फेब्रुवारी अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनंतर परिस्थिती चिघळली. त्या कारवाईत आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर इराणने तीव्र प्रत्युत्तर देत आखाती भागातील अमेरिकन तळांवर हल्ले केले, तसेच इस्रायलवर क्षेपणास्त्र डागून संघर्ष अधिक तीव्र केला. या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम होर्मुज सामुद्रधुनीवरील जहाजवाहतुकीवर झाला आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील ऊर्जा पुरवठा या मार्गावर अवलंबून असल्यामुळे, त्यातील अडथळ्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. परिणामी अनेक देशांनी चिंता व्यक्त केली असून, तातडीने तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS